घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकामगार मारहाणप्रकरण : मुहूर्त मॉलचा मालक फरार; दोघे ताब्यात

कामगार मारहाणप्रकरण : मुहूर्त मॉलचा मालक फरार; दोघे ताब्यात

Subscribe

नाशिक : सिटी सेंटर मॉलजवळील मुहूर्त मॉलमध्ये 55 हजार रुपयांचे कपडे चोरल्याप्रकरणी सेल्समनला जबर मारहाण करणार्‍या चौघांपैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांना बुधवारी (दि. 4) न्यायालयात हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे, मुहूर्त मॉलचे मालक व त्याचे दोन साथीदार गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. अभिषेक सिंग (रा. नाशिक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विशाल सुधाकर वाहुळकर (24, रा. जे. पी. नगर, सातपूर) असे मारहाण केलेल्या कामगाराचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अभिषेक सिंग व त्याचा साथीदार हे दोघे अटकेत असून, शोरुममधील महागडे कपडे चोरल्याच्या कारणावरून मुहूर्त मॉलचा मालक संशयित रितेश जैन, विनीत राजपाल यांच्यासह बाऊन्सर अभिषेक सिंग आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी सेल्समन विशाल यास २६ डिसेंबर 2022 रोजी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यास एका फ्लॅटवर नेले आणि त्या ठिकाणीही मारहाण करून डांबून ठेवले. मंगळवारी (दि. २७) रात्री त्याची सुटका केली. वाहुलकर घरी पोहोचल्यानंतर त्याने आपबिती कुटूंबियांना सांगितली. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी पथकाला तपासाच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी संशयित अभिषेक सिंगसह एका साथीदारास अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने (दि. 4) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. मॉलमधील 25 हजार रुपयांच्या दहा जीन्स पँन्ट व 25 हजारांचे शर्ट चोरुन नेल्याप्रकरणी विशाल वाहुळकरविरोधात चोरी केल्याचा गुन्हा गंगापूर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. तशी फिर्याद मुहूर्त मॉलच्यावतीने विशाल भोळे यांनी दिली आहे. दरम्यान चोरलेले कपडे वाहुळकर याने मॅनेजर राठोड यांच्या ताब्यात दिले असून चोरीची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बैसाणे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -