घरमहाराष्ट्रनाशिकशिवरायांना अनोखे अभिवादन ; जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी

शिवरायांना अनोखे अभिवादन ; जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी

Subscribe

देविदास हिरेंची कला

चांदवड : शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.१७) छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याची किमया केली आहे चांदवडचे देविदास शिवराम हिरे यांनी. ते भगूर शिक्षण मंडळ संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव शाळेत कलाशिक्षक आहेत.

शिवजयंतीनिमित्त महाराजांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करावे या प्रेरणेने (२.५ सें.मी. x २.५ सें.मी.) आकारात ड्रॉईंग पेपरवर बोटांच्या साहाय्याने ५७ मिनिटात ही अनोखी शिवरायांची प्रतिमा रागोंळीमध्ये साकारली आहे. इतक्या लहान आकारात शिवरायांची रांगोळी साकारणारे हिरे हे पहिले कलाकार आहेत. विविध पुरस्काराने सन्मानित देव हिरे या नावाने प्रसिद्ध नेहमीच विविध विषयांवर आपल्या फलक रेखाटन, रांगोळी, चित्र, स्केच या कलेतून विविध प्रयोग करत असतात. या रेकॉर्ड ब्रेक, अद्भुत, सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळीने त्यांच्या प्रयोगात अजून भर घातली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -