Spondylosis Symptoms And Treatment: नवनीत राणा ‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस’ त्रास; जाणून या आजाराची लक्षणे आणि कारण

navneet rana struggling with spondylosis find out spondylosis symptoms and treatment
Spondylosis Symptoms And Treatment: नवनीत राणा 'सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस' त्रास; जाणून या आजाराची लक्षणे आणि कारण

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना 12 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर बुधवारी जामीन मिळाला आहे. मात्र तुरुंगातून बाहेर पडताच त्यांना स्पॉन्डिलायसिस नावाच्या आजार बळावला आहे. नवनीत राणा सध्या ‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस’चा त्रास सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत हा आजार नेमका काय आहे आणि त्यावरील उपचार पद्धती काय अशी चर्चा सुरु झाली आहे. खरं तर, हा एक सामान्य आजार आहे. ज्यातून लवकर बरं होणं शक्य आहे. या आजाराला एक प्रकारे गाउट रोग असेही म्हणतात. दरम्यान नवनीत राणांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करण्याच्या आव्हानानंतर त्यांच्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्या तुरुंगात शिक्षा भोगत होत्या. यादरम्यान वाढता तणावामुळे नवनीत राणा ‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आजाराचा सामना करावा लागतोय. दरम्यान नवनीत राणा यांनी मानेचे दुखणे जाणवतेय. त्यामुळे त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या आजारादरम्यान कंबरेपासून वेदना सुरु होतात तसेच पाठ आणि मानेमध्ये जडपणा जाणवतो. एकप्रकारे मान दुखू लागते. दर तीन व्यक्तामागे एका व्यक्तीला हा मानेच्या दुखण्याचा त्रास आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. मानेतील मणक्यांची झीज झाल्याने ‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस आजार उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे, नस दबली जाणे असे आजार यात होऊ शकतात. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते.

‘सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस’ आजाराची लक्षणे

१) मान दुखणे, भोवळ येणे.

२) हात बधीर होणे, क्वचित डोकेदुखी.

३) पूर्णपणे मान वळवता न येणे.

४) एक किंवा दोन्ही हातात मुंग्या येणे.

५) हाताने वस्तू उचलता न येणे.

सर्व्हायकल स्पाँडिलिसिसची कारणे

१) सततचा वाहनांवरून प्रवास

२) कॉम्प्युटर/ मशीनवर काम करणे

३) व्यायामाचा अभाव

४) ओझे उचलणे

५) मानेवर आघात

६) कॅल्शियमची कमतरता

स्पॉन्डिलोसिसचा उपचार

औषधोपचार-वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू होतो.

१) कॉलर बेल्ट

२) फिजिओथेरपी

३) व्यायाम

४) मसाज

५) आयुर्वेदिक औषधे

६) पंचकर्म-नस्यकर्म

दरम्यान गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णांना शस्त्रक्रिया करावी लागते.


दिशादर्शक नामफलकांचे १५० कोटींचे कंत्राट मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा घाट