घरताज्या घडामोडीNavneet-Ravi Rana In Court : तर आम्हाला फाशी द्या, कोठडी सुनावताच नवनीत...

Navneet-Ravi Rana In Court : तर आम्हाला फाशी द्या, कोठडी सुनावताच नवनीत राणांचे पहिले ट्विट

Subscribe

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनाही वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी ही येत्या २९ तारखेला होणार आहे. राणा दांपत्याला न्यायलयीन कोठडी सुनावल्यानंतर नवनीत राणा यांचे पहिले ट्विट समोर आले आहे. हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का ? असा सवाल नवनीत राणा यांनी ट्विटच्या माध्यमातून केला आहे. तर हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा असेल तर आम्हाला फाशी द्या अशा स्वरूपात नवनीत राणा यांनी आपल्या भावना ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

काय नवनीत राणा यांचे ट्विट ?

हनुमान चालीसा वाचणे पाप आहे का? कलम १२४ (अ) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा.. देशातील जनतेला आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे. असेल तर आम्हाला फाशी द्या..

- Advertisement -

याआधीच्या ट्विटमध्ये नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचे ट्विट केले होते. तसेच सांताक्रुज पोलीस स्टेशनच्या कोठडीत रात्रभर 101 वेळा केले हनुमान चालीसाचे पठण केल्याचेही ट्विट त्यांनी केले होते. तसेच किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानेही नवनीत राणा यांनी ट्विट करत या हल्ल्याच्या निषेध केला होता. महाराष्ट्र राज्यमधे अराजकता पसरत आहे पोलीस स्टेशनच्या परिसरात उद्धव ठाकरे कडून गुंड पाठवून किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्याचा जाहीर निषेध, अशा आशयाचे ट्विट त्यांनी शेअर केले होते.

- Advertisement -


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -