घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी

Subscribe

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमधून माजी मंत्री नवाब मलिक यांना डच्चू देण्यात आला आहे. नवाब मलिक आणि जितेद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आघाडीचे प्रवक्ते होते. त्यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारणीमधून माजी मंत्री नवाब मलिक यांना डच्चू देण्यात आला आहे. नवाब मलिक आणि जितेद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आघाडीचे प्रवक्ते होते. त्यामुळे माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Nawab Malik Jitendra Awhad NCP National office Bearers secretary spokesperson Sharad pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 10 व 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात राष्ट्रावादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी एकमताने ही निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले.

- Advertisement -

याशिवाय, प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसची राष्ट्रीय पदाधिकारी :

- Advertisement -
  • शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष
  • प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष
  • सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस
  • योगानंद शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस
  • के के शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस
  • पीपी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस
  • नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस
  • जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस
  • वाय पी त्रिवेदी – राष्ट्रीय कोषाध्यक्ष
  • एस आर कोहली – स्थायी सचिव

राजीव झा, हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव पदावर करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबईत १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -