घरमहाराष्ट्रभाजप नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या NCB कार्यालयातील हालचाली वाढल्या; नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

भाजप नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या NCB कार्यालयातील हालचाली वाढल्या; नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

Subscribe

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात शुक्रवारी खळबळजनक दावा केला आहे. भाजप नेत्यांच्या राईट हँड असलेल्या व्यक्ती एनसीबी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटतात. गुरुवारपासून या हालचाली वाढल्या आहेत, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिकांच्या दाव्यामुळे कोणत्या भाजप नेत्यांच्या जवळच्या व्यक्ती आहेत आणि एनसीबी कार्यालयात का जात आहेत याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

नवाब मलिक यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक दावे केले. यात त्यांनी भाजपसंदर्भात दावा केला आहे. भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांच्या जवळचे लोकं एनसीबीच्या कार्यालयात जातात, तिथे अधिकाऱ्यांना भेटतात. मी जबाबदारीने सांगतो की भाजपच्या काही नेत्यांचे राईट हँड समीर वानखेडे यांना भेटतात. कालपासून त्या हालचाली वाढल्या आहेत, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र

महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र सरकाराला बदनाम करण्याचा षडयंत्र रचलं गेलं आहे. ही केस रिया चक्रवर्ती पासून सुरु झाली, समीर वानखेडेंनी गुन्हे दाखल केले, बॉलिवूडवाल्यांच्या रांगा लागल्या, एकालाही अटक झाली नाही. जर केसमध्ये काही असेल तर कारवाई होते. पण काहीच झालं नाही, असं नवाब मलिक म्हणाले.

भाजपकडून षडयंत्र रचलं जात आहे. महाराष्ट्राला, मुंबईला, महाराष्ट्र सरकारला, बॉलिवूडला बदनाम केलं जात आहे. कारण योगी आदित्यनाथ यांना नोएडामध्ये फिल्म सिटी बनवायची आहे. ताज महल हॉटेलमध्ये भाजपला ज्यांचं समर्थन आहे, ते लोक त्यांना भेटले. त्यांना हे वाटतंय की, बॉलिवूडला बदनाम केलं तर हे बॉलिवूड मुंबईच्या बाहेर जाईल, असं नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – हिवाळी अधिवेशनात जे समोर आणणार आहे, भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवणं कठीण होईल – नवाब मलिक

ड्रग्ज, पॉर्नोग्राफी रॅकेट चालवणाऱ्या काशिफ खानविरोधात कारवाई करण्यास वानखेडेंनी रोखलं; मलिकांचा आरोप


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -