घरमहाराष्ट्रगडचिरोलीत बॅनर्स लावून नक्षलवाद्यांची सरकारला धमकी

गडचिरोलीत बॅनर्स लावून नक्षलवाद्यांची सरकारला धमकी

Subscribe

बॅनरच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका अशी धमकी सरकाला दिली आहे. आसपासच्या गावामध्ये देखील त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत.

गडचिरोलीच्या जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी सी – ६० या जवानांच्या बसवर भ्याड हल्ला केला. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसूरुंगाच्या स्फोटामध्ये १५ जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांचा बदला घ्या अशी भावना आता सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. अशामध्येच नक्षलावाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. ज्याठिकाणी नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामासाठी उभ्या असलेल्या गाड्यांची जाळपोळ केली होती त्याठिकाणी त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरच्या माध्यमातून त्यांनी गडचिरोलीमध्ये पूल आणि रस्ते बांधू नका अशी धमकी सरकाला दिली आहे. आसपासच्या गावामध्ये देखील त्यांनी हे बॅनर्स लावले आहेत. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीच्या आशयाखाली हे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

नक्षलवाद्यांनी लावलेल्या बॅनर्समध्ये त्यांनी एप्रिल २०१८ मध्ये कसनसू येथे झालेल्या ४० नक्षलवाद्यांच्या एन्काऊंटरचा तीव्र निषेध केले आहे. २२ एप्रिल २०१८ रोजी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ४० नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले होते. २७ एप्रिल २०१९ रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान, त्यांनी असे म्हटले आहे की, विकासाच्या नावाखाली गडचिरोलीच्या जंगलात सुरु असेलेल्या रस्त्यांची आणि पुलांची कामं थांबवावी.

- Advertisement -

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करून धुमाकूळ घातल्याचा प्रयत्न केला. छत्तीसगड सीमेकडील भागात सशस्त्र नक्षल्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील ३० पेक्षा अधिक वाहने आणि डांबर प्लांटला आग लावली. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. ही घटना कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे घडली. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३६ चे काम सुरू आहे. हे काम छत्तीसगडमधील दुर्ग येथील अमर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. या कंपनीचा दादापूर येथे गावाशेजारीच डांबर प्लांट आणि दोन कार्यालयेही आहेत. तेथे रस्त्याच्या कामवरील अनेक वाहने होती.

नक्षलवाद्यांनी जाळपोळ करुन धुमाकूळ घातल्यानंतर त्याठिकामी बंदोबस्तासाठी जात असलेल्या सी-६० पोलिसांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. टाटा एस या मालवाहू वाहनातून पोलिसांचे पथक जात होते. भूसुरुंगाचा स्फोट करुन त्यांनी पोलिसांच्या दोन गाड्या उडवल्या. या स्फोटामध्ये १५ पोलीस शहीद झाले तर गाडीचालकाचा मृत्यू झाला. या शहीद जवानांमध्ये गडचिरोलीमधील सहा, भंडारा जिल्ह्यातील तीन, बुलडाणा जिल्ह्यातील दोन तसेच हिंगोली, बीड, नागपूर, यवतमाळ येथील प्रत्येकी एका जवानाचा समावेश आहे. आज गडचिरोली पोलीस मुख्यालयात शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -