घरमहाराष्ट्रअजित पवारांनंतर रोहित पवारही अडचणीत? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

अजित पवारांनंतर रोहित पवारही अडचणीत? आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची शक्यता

Subscribe

राज्यातील राजकीय सत्तांतरानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा तपास सुरु केला आहे. या घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टाकडे परवावनगी मागितली आहे. अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.

दरम्यान राज्य सहकारी बँक घोटाळ्यातील ईडीच्या चौकशीनंतर पवार कुटुंबियांषी संबंधित कंपन्यांकडून संशयास्पद लिलावाद्वारे कारखाने खरेदी करण्यात आले आहेत का, याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास केला जाणार आहे. यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना तसेच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. यामुळे आता कोर्टाने परवानगी दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पवार काका पुतण्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांसह एकूण 75 जणांना दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चीट दिली होती, मात्र आता पुन्हा तपास सुरु केला आहे. या आरोपांबाबत फेरतपास सुरु करण्यात आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेकडून काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयात देण्यात आली होती.

शिखर बँकेच्या संचालक मंडळातील संचालकांनी तसेच कर्ज मंजुरी समित्यांनी अनेक सहकारी कारखाने, सूत गिरण्या तसेच संचालकांचे हितसंबंध असलेल्या कंपन्यांना नियमबाह्यपणे व सवलतीच्या दरात कर्जाचे वितरण केले. अशा कर्जांची परतफेड न झाल्याने बँक डबघाईस आली आणि सरकारी तिजोरीचे 25 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, याप्रकरणी राज्य सरकारच्या सहकारी विभागातील प्रधिकृत अधिकाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यातील कलम 88 अन्वये तत्कालीन संचालक मंडळातील संचालकांवर सप्टेंबर-2015 मध्ये आरोपपत्र ठेवले. यास काहींनी फौजदारी कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दिली, तरीही कोणतीच कारवाई झाली नाही, असाही आरोप फिर्यादी अरोरा यांनी केला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अरोरा यांनी 2015 मध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार ‘इओडब्ल्यू’ने माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला. यात अजित पवार, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबरोबरच हसन मुश्रीफ, राजन तेली, श्रीनिवास देशमुख, माणिकराव कोकाटे अशा अनेक बड्या राजकीय नेत्यांना आरोपी करण्यात आले आहे.


सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस-मोदींनी केलं नाही; ‘सामना’तून थेट टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -