अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १,३४,८० मृत्यूंची वाट का पाहिली?; मोदींना राष्ट्रवादीचा सवाल

NCP ask question pm narendra modi about emotional during video conference
अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १,३४,८० मृत्यूंची वाट का पाहिली?; मोदींना राष्ट्रवादीचा सवाल

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अजूनही कोरोनाची दुसरी लाट मंदावली नसूनही तिसऱ्या लाटेचे संकट सध्या देशावर घोंघावत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांच्या वाराणसी मतदारसंघातील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सर्व लोकांना विनम्र श्रद्धांजली आणि सांत्वन व्यक्त केले. यादरम्यान श्रद्धांजली वाहताना मोदी काही वेळासाठी थांबले आणि ते अत्यंत भावूक झाल्याचे दिसले. त्याचे डोळे पाणावले होते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर एका फोटोसहीत पोस्ट केली आहे. या पोस्टद्वारे राष्ट्रवादीने मोदींवर निशाणा साधला आहे. गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोस्टमध्ये नक्की काय लिहिले आहे? वाचा

आसववाहिनी गंगा मोदींच्या डोळ्यांतूनही, पानी दा रंग वेख के आंखियाँ चो हंजो रोड़ दे

गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर अश्रू ढाळण्यासाठी मोदीजींनी १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची वाट का पाहिली?
कोरोनामुळे जीव गमावलेल्यांबद्दल बोलत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांना अश्रू अनावर झाले, अशी बातमी सध्या सर्व माध्यमांवर सुरू आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची दखल माननीय पंतप्रधानांनी घेतली, ही समाधानाची बाब आहे. मात्र १ मार्च २०२१ रोजी हसतमुखाने लस घेतल्यानंतर पंतप्रधानांनी मागच्या दोन महिन्यात काय उपाययोजना केल्या याबाबतही त्यांनी देशाला माहिती द्यायला हवी. १ मार्च २०२१ रोजी भारतातील कोरोनामुळे झालेले मृत्यू १ लाख ५७ हजार २८६ एवढे होते. हा मृत्यूचा आकडा २० मे २०२१ रोजी २ लाख ९१ हजार ३६६ वर पोहोचला. मधल्या अडीच महिन्यात जवळपास १ लाख ३४ हजार ८० मृत्यूंची नोंद झाली. गंगा शववाहिनी झाली. देशभर स्मशानासाठीही रांगा लावून कूपन घेण्याची वेळ आली. मागच्या वर्षभरात जेवढ्या मृत्यूंची नोंद झाली होती, जवळपास तेवढ्याच मृत्यूंची नोंद दुर्दैवाने मागच्या अडीच महिन्यात झाली.

पंतप्रधानांनी नक्कीच अश्रू ढाळावेत. पण या अडीच महिन्यात लोकांना लस, ऑक्सिजन आणि औषधे का मिळाली नाहीत? याचेही उत्तर जनतेला द्यावे लागेल. नाहीतर हकनाक ॲक्टर मोदी सारखा हॅशटॅग पुन्हा पुन्हा ट्रेंडिंगला येत राहील.

आसववाहिनी गंगा मोदींच्या डोळ्यांतूनही

पानी दा रंग वेख के आंखियाँ चो हंजो रोड़ दे

गंगा शववाहिनी होऊन वाहिल्यानंतर अश्रू…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Friday, May 21, 2021