घरमहाराष्ट्र'माझी निवडणूक, माझा खासदार'; पार्थ पवारांची प्रचार मोहीम

‘माझी निवडणूक, माझा खासदार’; पार्थ पवारांची प्रचार मोहीम

Subscribe

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे उर्फ विठ्ठल आणि नगरसेविका शीतल काटे यांच्याकडून 'माझी निवडणूक, माझा खासदार' ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरात प्रचाराची यंत्रणा पोहोचणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पक्षाकडून मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून निवडूण यावे, यासाठी प्रचारसभांची मोठी धामधुम सुरु आहे. दरम्यान पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाना काटे उर्फ विठ्ठल आणि नगरसेविका शीतल काटे यांच्याकडून ‘माझी निवडणूक, माझा खासदार’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत घराघरात प्रचाराची यंत्रणा पोहोचणार आहे. दरम्यान, अजित पवार आणि पार्थ पवार यांच्या हस्ते या प्रचार मोहिमेचा शुभारंभ झाला.

असे असतील प्रचाराची सुत्रे?

पिंपळे सौदागर येथील नेते काटे यांच्या संपर्क कार्यालयातून याची सुत्रे हलणार आहेत. नागरिकांच्या घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी केलेली विकास कामे यांविषयी माहिती दिली जाणार आहे. त्यांची काम करण्याची हातोटी आता पार्थ पवार यांच्या माध्यमातून शहराला लाभणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना निवडून देण्याची किती गरज आहे, हे नागरिकांना पटवून सांगितले जाणार आहे. नागरिक आणि नव मतदारांना जागरूक करण्यासाठी ‘माझी निवडणूक, माझा खासदार’ या ब्रीद वाक्याखाली खासदार म्हणून उमेदवाराची निवड कशी करावी, याची माहिती सांगितली जाणार आहे. सोशल मीडियाद्वारे याची माहिती शेअर केली जाणार आहे. जास्तीत जास्त तरुणांनी ही माहिती घराघरात पोहोचविण्याचे आवाहन काटे यांच्याकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -