घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : मी रडणारी नाही, लढणारी वाघीण; मुनगंटीवारांच्या टीकेला धानोरकरांचे...

Lok Sabha 2024 : मी रडणारी नाही, लढणारी वाघीण; मुनगंटीवारांच्या टीकेला धानोरकरांचे चोख प्रत्युत्तर

Subscribe

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभेतून महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धानोरकरांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत काल बुधवारी (ता. 27 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला असून काल चंद्रपुरात कोहिनुर ग्राउंड येथून येथून निघालेल्या रॅलीत हजारो कार्यकर्ते, समर्थक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. (Pratibha Dhanorkar sharp reply to Sudhir Mungantiwar criticism)

हेही वाचा… Lok Sabha 2024 : …ते तुम्हाला उद्धव ठाकरे शिकवतील; स्टार प्रचारकांच्या यादीवरील टीकेवरून सेनेचा पलटवार

- Advertisement -

“जर तुम्ही अश्रू पाहून व्यक्तिगत सहानुभूतीवर मतदान कराल तर, 4 वर्ष 11 महिने 29 दिवस, 23 तास आणि 59 मिनीटे तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही,” असे म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला धानोरकर यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. जातीच्या भरवशावर, अश्रू ढाळून मते मिळत नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. मी त्यांना सांगू इच्छिते अश्रूंना पुढे करून मी मते मागणार नाही. मी रडणारी नाही, लढणारी वाघीण आहे.

तसेच, बाळू धानोरकरांच्या जाण्याने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ पोरका झाला होता. माझ्यावर, माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दुःख बाजूला सारून मतदारसंघ मी पिंजून काढला. अशात एखाद्यावेळी डोळे दाटून आले तर त्याचेही तुम्ही भांडवल करता. तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली. एका विधवेच्या अश्रूंचा तुम्ही अनादर केला. इथे बसलेल्या माझ्या माया, बहिणी तुम्हाला माफ करणार नाहीत, असेही महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तर, अनिच्छेने एखाद्या नवरदेवाला लग्नाच्या मंडपात बसल्यावर ते लग्न टिकत नाही आणि संसार मोडतो, अशा नवरदेवासारखी केविलवाणी परिस्थिती सुधीर मुनगंटीवार यांची झाली आहे. ही लढाई हुकूमशाही विरोधात लोकशाहीची आहे. या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलू पाहणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. या लढाईत प्रत्येकजण शूर शिपाई आहे, असे म्हणत प्रतिभा धानोरकरांनी उपस्थितांचे मनोबल उंचावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -