घरमहाराष्ट्रगांधीवाद्यांचे आभार मानावे लागणं हाच गांधीवादी विचारांचा विजय - जयंत पाटील

गांधीवाद्यांचे आभार मानावे लागणं हाच गांधीवादी विचारांचा विजय – जयंत पाटील

Subscribe

गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे.

कोरोना काळात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने बॅकस्टेज कलाकारांना केलेल्या मदतीसंबंधी माहिती देण्यासाठी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार मानण्यासाठी अभिनेते शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थित होते. अभिनेते शरद पोंक्षेंच्या उपस्थितीवरुन राष्ट्रवादीवर चौफेर टीका होत आहे. गांधी हत्येचं समर्थन करणाऱ्या शरद पोंक्षेंना राष्ट्रवादी बोलावते कशी सवाल केला जात आहे. यावर आता राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे, अशी सारवासारव जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी ट्विट करत पक्षाची भूमिका मांडवली आहे. “महात्मा गांधींची हत्या हे भारतातील पहिले दहशतवादी कृत्य होते. गांधींच्या हत्येचे समर्थन करणारे विचार, हेदेखील निश्चितच विकृत विचार आहेत, अशी माझी ठाम धारणा आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने बॅकस्टेज कलाकारांना कोरोना काळात तीस लाखांहून अधिक रकमेची आर्थिक मदत करण्यात आली. याबद्दल आभार मानण्यासाठी शरद पोंक्षे हे नाट्य परिषद पदाधिकारी, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यासोबत पक्ष कार्यालयात आले होते. यापलीकडे शरद पोंक्षे यांचा आणि पक्षाचा कोणताही संबंध नाही व कधीच नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गांधीवादी विचारांचा पक्ष आहे. गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानण्याची वेळ यावी, हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय आहे,” अशा आशयाचं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

हेही वाचा – चीनकडून सायबर हल्ले वाढले, पाच दिवसांत ४० हजार वेळा सायबर हल्ले


राष्ट्रवादीच्या व्यासीठावर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक – जितेंद्र आव्हाड

अभिनेते शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या स्टेजवर उपस्थिती दर्शवल्याने राष्ट्रवादीवर टीका होत आहे. यावर राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राष्ट्रवादी पक्षाच्या व्यासीठावर वर विकृत शरद पोंक्षे येणे हे क्लेश कारक दुर्दैवी होते पण पुरोगामी कार्यकर्त्यां चा आक्रोश जयंत पाटील यांच्या कानी पडताच त्यांनी पक्षाची भूमिका अत्यंत तत्परतेने स्पष्ट केली,” असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -