घरताज्या घडामोडीमी समाजाला जोडणारा, दंगली घडू नये म्हणून बोलतोय - जितेंद्र आव्हाड

मी समाजाला जोडणारा, दंगली घडू नये म्हणून बोलतोय – जितेंद्र आव्हाड

Subscribe

'मी समाजाला जोडणारा माणूस आहे. माझे कोणतेही विधान मी अतंत्य गांभीर्याने आणि विचारपूर्वक करत असतो. मी माझ्या विधानावर ठाम आहे', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

‘मी समाजाला जोडणारा माणूस आहे. माझे कोणतेही विधान मी अतंत्य गांभीर्याने आणि विचारपूर्वक करत असतो. मी माझ्या विधानावर ठाम आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघतात त्यामध्ये दंगली होतात असे, वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आव्हाडांच्या या विधानावर फडणवीसांनी निशाणा साधला होता. (ncp leader Jitendra awhad criticism DCM Devendra Fadnavis)

नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

- Advertisement -

“समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी आमच्यासारखी लोक 40 वर्ष काम करत आहेत. मी माझ्या डोळ्यासमोर अनेक दंगली पाहिल्या आणि शमवल्या आहेत. त्यामुळे दंगल हा भाग माझ्याशी कधी जोडताच येणार नाही. मी समजाला जोडमारा माणूस आहे. माझे कोणतेही विधान मी अतंत्य गांभीर्याने आणि विचारपूर्वक करत असतो. मी माझ्या विधानावर ठाम आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सध्या देशात घडतंय ते सनसनाटी आहे. खारघरमध्ये जे झालं तेही सनसनाटीच होतं. इतका निष्काळजीपणा, इतकी असंवेदनशीलता सरकार दाखवूच कसे शकतं. त्यावर बोलायचं नाही का? त्या दुर्घटनेत मेले ते हिंदू नव्हते का? कायम हिंदू-मुसलमान करणारे सरकार यावर का नाही बोलत? हिंदूंना मारण्याची सुपारी या सरकारने घेतली होती का? असे बोलले तर सरकारला राग येतो आणि मग गुन्हा दाखल करण्यास सांगतात. पण आपण बोलता तेव्हा काय करायचं? असे सवालही यावेळी आव्हाडांनी उपस्थित करत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

- Advertisement -

तेव्हाचा हनुमान प्रेमळ होता

मी कुठे म्हटलं माझे विधान मी मागे घेतो? मी कुठे म्हटले माझ्यावर तक्रारी दाखल करू नका? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. तसेच, यावेळी ‘अंजनीच्या सुता तुला रामाचं वरधान…’ हे हनुमानाचं गाणंही आव्हाडांनी गायलं. शिवाय, तेव्हाचा हनुमान प्रेमळ होता. छातीत राम दाखवणार हनुमान दिसायचं. तो बजरंगबली असला तरी प्रेमाचा प्रतीक वाटायचा. पण आता गदा घेऊन.. तेव्हा असा नव्हता, असेही आव्हाड म्हणाले.

भगवा बघितला की, लोकं पळत सुटतात

दरम्यान, “तो भगवा आम्हला माहीत आहे, जो तुकरामांचा, शैवांचा जर विठ्ठलाकडे चालला असेल तर, त्यावेळी लोक विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यासाठी त्याला रुपया द्यायचे. इतका भगव्यावर विश्वास होता. पण आता भगवा बघितला की, लोकं पळत सुटतात”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“आता मी बोललो नाही, तर महाराष्ट्राला कळणार नाही. माणसाच्या मृत्यूपेक्षा कशाला किंमत असते का? आपण लढायला निघालो तर सत्य सांगावच लागतं. मला काही जन्मठेप होणार नाही. यावरही आणखी दोन दिवस जेलमध्ये जाईल. रामनवमी आणि हुनमान जयंती ज्या पद्धतीने केलं जायचं, रामाची, हनुमानाची पूजा व्हायची, हे मी घरात अनुभवले. मी असो बोललो की, सध्या परिस्थिती अशी तयार करण्यात येते की, रामनवमी-हनुमान जयंती हे उत्सव केवळ दंग्यांसाठीच आहे, हे दाखवलं जात. यामुळे हे उत्सव बदनाम होत आहे. मी हिंदू आहे, कट्टर हिंदु आहे. वासुदैव कुटुंब मानणारा हिंदू आहे”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“श्रीराम आपल्या आईचे ऐकणारे होते, आपल्या भावाला सन्मानित कऱणारे राम सर्वांना माहित आहेत. हे उत्सव समाजात एकता निर्माण करतात. पण समाजात विष पेरलं जात आहे. हे व्हायला नको. समाजात द्वेष परवल्याने देशाचे नुकसान होते”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य आक्षेपार्ह, संवेदनशीलपणे बोलावं – देवेंद्र फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -