‘गणेश नाईक स्वार्थी माणूस, त्यांनी कोणाशीही इमान राखले नाही’, आव्हाडांनी डागली तोफ

राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात घमासान सुरू आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर तोफ डागली. 

Jitendra Awhad's question to BJP Who is the recruitment contractor in the army
सैन्यदलातील सैन्यात भरतीचा कॉन्ट्रॅक्टर कोण?, जितेंद्र आव्हाड यांचा भाजपला सवाल

नवी मुंबईतील वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी (Arenja Circle to Kopari) या २ किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठी तब्बल ४०० झाडांची कत्तल (Tree Cutting) करण्यात येणार आहे. यावरून राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात घमासान सुरू आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते गणेश नाईक यांच्यावर तोफ डागली.

‘जी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची होऊ शकली नाही तो माणूस नवी मुंबईकरांचा कसा होणार’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केला आहे. ‘वृक्षतोडीचा हा ठराव नवी मुंबईला स्वत:ची सल्तनत मानणाऱ्या गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्या पुढाकारानेच २००८ साली मंजूर झाला होता. या पापाची जाणीव गणेश नाईक यांचं मन आतल्याआत खात होती. त्यामुळेच आज आमच्या आंदोलनाच्या दिवशी गणेश नाईक यांनी आंदोलन केले’, असंही आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – गिरणी कामगारांना ७५ हजार घरे देणार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

ते पुढे म्हणाले की, वृक्षांची कत्तल करुन ४५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल बांधण्याचा ठराव नाईक यांनीच मंजूर करवून घेतला होता. गणेश नाईक ही स्वार्थी व्यक्ती आहे. हा माणूस कधीच कोणाचा होऊ शकला नाही. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना घडवलं त्यांची साथ गणेश नाईक यांनी सोडली. ज्या शरद पवार यांनी सत्तेतला सगळा वाटा आणि संपूर्ण जिल्हा हवाली केला त्यांच्याशीही गणेश नाईक यांनी इमान राखले नाही. असा माणूस नवी मुंबईकरांचा काय होणार, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.

वाचा – हिंमत असेल तर केतकीचे समर्थन करून दाखवाच – जितेंद्र आव्हाड

गणेश नाईक यांच्यासोबतच त्यांनी नवी मुंबई महापालिकेचे प्रशासक बांगर यांच्यावर आरोप केले. या उड्डाणपुलासाठी कोणाला तरी १० टक्के रक्कम मिळाली असल्याचं ते म्हणाले. तसेच, २००८ मधील या ठरावाची अंमलबजावणी आता २०२२ मध्ये करायचे का ठरवले? राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या व्यक्तीने आयएएस होऊ नये अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी या २ किलोमीटरच्या उड्डाणपुलासाठी ४०० झाडे कापली जाणार आहेत. याविरोधात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून मोर्चा काढण्यात आला. तसेच, एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे दुतर्फा असणाऱ्या अडीच हजार झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.