घरताज्या घडामोडी'त्या' अध्यादेशाला विरोध करण्यासाठी शरद पवारांचा केजरीवालांना पाठिंबा

‘त्या’ अध्यादेशाला विरोध करण्यासाठी शरद पवारांचा केजरीवालांना पाठिंबा

Subscribe

दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारा अध्यादेशा केंद्र सरकार संसदेत मांडणार आहे. या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.

दिल्ली सरकारच्या अधिकारांवर गदा आणणारा अध्यादेशा केंद्र सरकार संसदेत मांडणार आहे. या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार आणि अरविंद केजरीवाल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी शरद पवार यांनी शरद पवारांनी आम्ही (राष्ट्रवादी) संसदेत येणारे बील पास होऊ देणार नाही, असे आश्वासन दिल्याचे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.(NCP Sharad Pawar Maharashtra Delhi Government Arvind Kejriwal Mumbai)

नेमकं काय म्हणाले अरविंद केजरीवाल?

- Advertisement -

“दिल्लीच्या लोकांवर वारंवार अन्याय केला जात आहे. 2015 मध्ये जेव्हा आमचे सरकार आले होते. तेव्हा 23 मे 2015 रोजी एक नोटीस जारी करत केंद्र सरकारने दिल्ली सरकारकडून अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार काढून घेतले. आठ वर्ष (2015 ते 2023) झाली तरी, दिल्लीची लोक न्यायालयाच्या पायऱ्या सातत्याने चढत होते. मात्र आठ वर्षांनंतर आता सर्वोच्च न्यायालयाने पाच सदस्यीय खंडपीठाने सर्व अधिकार दिल्लीकरांच्या हाती दिले. त्यानुसार, दिल्लीतील लोकांनी निवडलेल्या सरकारला काम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर सरकार काम करत नसेल तर, लोकांनी मतदान करून निवडून दिलेल्या सरकारचा काहीच फायदा नाही”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

“परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला सर्व अधिकार दिले. आठ वर्षांपासून सुरू असलेली लढाई 11 मे 2023 रोजी आम्ही जिंकलो. पण, 19 मे 2023 रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अध्यादेश आणत सर्व अधिकार पुन्हा काढून घेतले. तसेच, सर्व अधिकार हे फक्त केंद्र सराकरकडेच राहणार असे निश्चित केले. त्यामुळे केंद्र सरकारच्या या अध्यादेशाला विरोध करण्यासाठी आम्ही (दिल्ली सरकार) देशातील विरोध पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेत आहोत आणि दिल्लीकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करत आहोत. तसेच, संसदेत अध्यादेश आल्यास त्याला विरोध करण्याची मागणी करत आहोत”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

“आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना अध्यादेशाला विरोध करण्याची आणि आम्हाला समर्थन देण्याची मागणी केली. यावर शरद पवारांनी आम्ही (राष्ट्रवादी) संसदेत येणारे बील पास होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले”, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.


हेही वाचा – …तर राज्यात नाही फक्त केंद्रातच निवडणुका होतील; ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -