घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराष्ट्रवादीच्या अमृता पवार भाजपात; लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश?

राष्ट्रवादीच्या अमृता पवार भाजपात; लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश?

Subscribe

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या अमृता पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी माजी खासदार दिवंगत डॉ. वसंत पवार, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस निलीमा पवार यांच्या त्या कन्या आहेत.

मुंबई येथे आयोजीत या प्रवेश सोहळयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार राहुल आहेर आदी उपस्थित होते. अमृता पवार या नाशिक जिल्हा परिषद सदस्या आणि गोदावरी अर्बन को. ऑप. बँकेच्या विद्यमान अध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकारी, खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय असून राष्ट्रवादीचे दिवंगत माजी खासदार डॉ. वसंत पवार यांच्या त्या कन्या आहेत. पेशाने त्या अर्केटेक्चर आहेत. डॉ. पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात.

- Advertisement -

अमृता पवार यांचा जिल्हा परिषदेचा देवगाव गट विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघात जोडला गेला आहे. त्यामुळे सन २०२४ मध्ये होणारया विधानसभा निवडणूकीत अमृता पवार येवला मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असू शकतात अशीही चर्चा आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीसह इतर घटक पक्षामधून भाजपमध्ये इनकमिंग वाढली आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. मालेगाव येथील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता नाशिक जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून राहिलेल्या अमृता पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमधून भाजपला चांगले बळ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय आगामी निडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने चांगला डाव खेळल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. एकीकडे भाजप-शिवसेनेत असलेली फूट आणि महाविकास आघाडीने केलेली एकजूट यामुळे आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -