घरताज्या घडामोडीनिलेश लंकेंचा "वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन"ने गौरव, कोरोना काळातील कामाची जगभरात...

निलेश लंकेंचा “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन”ने गौरव, कोरोना काळातील कामाची जगभरात दखल

Subscribe

माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट - निलेश लंके

कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्यालाटेमध्ये महाराष्ट्राची अवस्था दयनीय झाली होती. राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेल्यामुळे आणि राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये कोरनाबाधितांना बेड अपुरे पडायला लागल्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात कोरोना सेंटर सुरु केले आहे. यावेळी पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांनी सुरु केलेल्या कोविड केअर सेंटरचे अख्ख्या जगाने कौतुक केले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार निलेश लंके यांनी भावळणी इथं १,१०० बेडे कोरोना केअर सेंडर उभं केलं आणि जे कोरोनाबाधित उपचार घेत होते अशा रुग्णांना उत्तम सेवा आणि काळजी निलेश लंकेनी घेतली होती. याचेच कौतुक देशासह जागतिक पातळीवर करण्यात येत होतं आता निलेश लंकेंना “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आमदार निलेश लंके यांनी कोविड सेंटर उभारुन या कोविड सेंटरमध्ये एखाद्या डॉक्टरप्रमाणे २४ तास सेवा दिली आहे. प्रत्येक रुग्णाच्या जवळ जाऊन निलेश लंके तब्येतीची विचारपुस करत होते. कोविड सेंटरमध्ये रुग्णाच्या विरंगुळ्यासाठी आणि मनोरंजनासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, योग शिबिरं, मनोरंजन कार्यक्रम, किर्तन,भजन अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. कोविड सेंटरमधील त्यांच्या मुक्त संचार आणि कार्यक्रमांचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन प्रचंड व्हायरल झाले आहेत.

- Advertisement -

निलेश लंकेंना परदेशातून मदत

आमदार निलेश लंके यांनी दुसऱ्या लाटेत रुग्णांना होणारा त्रास पाहून कोविड सेंटर उभारलं आहे. या कोविड सेंटरच्या खर्चासाठी निलेश लंकेंना सातासमुद्रापार डझनपेक्षाही अधिक देशांतून मदत मिळाली आहे. परदेशातूनच जवळपास लंकेंच्या कोविड सेंटरला कोट्यावधीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. निलेश लंकेंनी एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर उभारलं असून यामध्ये आतापर्यंत ७ हजार कोरोनाबाधितांनी उपचार घेतला आहे.

जनतेला सन्मान समर्पित

कोरोना काळत दिलेल्या सेवेची आणि लंकेंच्या कार्याची जगाने दखल घेतली आहे. निलेश लंकेंना “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. निलेश लंकेंचा हा सन्मान सोहळा मुंबईत पार पडला आहे. कोरोना काळात केलेल्या कामगिरीमुळे गौरवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी देशातील निलेश लंके हे पहिलेच आमदार ठरले आहेत. निलेश लंकेंनी आपला सन्मान हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सामान्य जनतेला समर्पित केला आहे. “कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल आज मला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या व्यक्तीला हा सन्मान भेटला ही खुप मोठी गोष्ट आहे. हे सगळे शक्य झाले माझ्यावरती प्रेम करणाऱ्या मायबाप जनतेमुळे व सहकारी” असे ट्विट निलेश लंके यांनी केलं आहे.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -