शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या, निलेश राणेंचा पुन्हा हल्ला

शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत, असा पुन्हा घणाघात भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

deepak kesarkar slams bjp leader narayan rane nilesh rane

दीपक केसरकरांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे हे मला चांगलं माहिती आहे. एकही नगरपालिका, नगरपंचायच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपचायत त्यांच्याकडे नाही. सगळ्या भाजपाकडे आहेत. शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत, असा पुन्हा घणाघात भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Nilesh Rane Attacks Deepak Kesarkar)

हेही वाचा – राणेंच्या मुलांना कोकणी माणसाने यापूर्वीच लायकी दाखवली; केसरकरांकडून निलेश राणेंना प्रत्युत्तर

निलेश राणे पुढे म्हणाले की, दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भाजपाच्या लोकांविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. हल्ली आम्ही त्यांची दखलही घेत नाहीत. ते नव्यानेच माध्यमांसमोर बोलायला शिकलेत. पण कधीतरी भरकटतात ते.”