कोरोनाच काय, नेटिझन्सनी निसर्ग चक्रीवादळालाही नाही सोडलं!

viral memes on cyclone

कुणी तुमच्यावर लिंबू फेकले, तर तुम्ही त्याचं लोणचं घालायचं असतं, अशा आशयाची एक म्हण हिंदीमध्ये बरीच प्रचलित आहे. पण कदाचित सध्या नेटिझन्सनी ही म्हण काहीशी जास्तच गांभीर्याने घेतली आहे की काय असंच चित्र दिसू लागलं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जगभरात कोरोनाचं संकट थैमान घालत आहे. त्यामुळे अर्थातच सोशल मीडियावरच्या काही क्रिएटिव्ह मंडळींनी कोरोनावर तुफान मीम्स आणि जोक्स व्हायरल केले. आता महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचं मोठं संकट उभं ठाकलं आहे. अगदी काही तासांमध्ये ते मुंबईसह कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात एकीकडे प्रशासकीय यंत्रणा बचावकार्यासाठी तयारी करत असताना नेटिझन्सनी मात्र चक्रीवादळाला देखील नाही सोडलं. आज सकाळपासूनच #CycloneUpdate या ट्वीटर ट्रेंडवर नेटिझन्सनी तुफान मीम्स व्हायरल करायला सुरुवात केली!

काहींनी मास्टर शेफ संजीव कपूरची रेसिपी शोधून काढली!

तर काहींना शाहरूख खानच्या बादशाह चित्रपटातला संवाद आठवला..

काहींनी सेल्फी लव्हर्सला टोले लगावले…

तर काहींनी नवाजुद्दीन सिद्दीकीच्या सेक्रेड गेम्समधल्या त्याच्या गाजलेल्या संवादाची सांगड या संकटाशी घातली…

रिअल लाईफमधून तुम्हाला व्हर्च्युअल विश्वात नेऊन तिथे थ्रिलिंग अशा गेमच्या लेव्हल खेळायला लावणारा जुमनजी चित्रपट आठवतोय का? मग बघा हे मीम!

आता चारही बाजूंनी संकटं आलेली असताना चुपके चुपके चित्रपटातला राजपाल यादवचा हा त्रागाही आठवत असेलच तुम्हाला!

कुठे नेटिझन्सनी कायम पूर आणि वादळाचा सामना करणाऱ्या पश्चिम बंगाल, ओडिशाची निसर्ग चक्रीवादळाशी तुलना केली आहे..

कुणाला तर निसर्ग, कोरोना, भूकंप, टोळधाड ही वेलकम चित्रपटातली मित्रमंडळी वाटली!

आणि व्हॉट्सअॅपवर आलेला एक मेसेज…

हवामान विभाग – चक्रीवादळ येत आहे..सुरक्षितपणे घरातच राहा!

नागरिक – भाई, कोरोना की वजह से ऑलरेडी घरपर ही है…अब क्या बाथरूम में जा के छुप जाएँ ?

खरंतर हे मीम्स किंवा विनोद सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले याचा अर्थ असा नाही की या संकटाचं कुणाला गांभीर्य नाही. मात्र, अशा संकट काळातही लोकांवरचा तणाव कमी करण्याचं काम या अशा विनोदांमधून होत असतं. त्यामुळे लोकांची मानसिकता अशा संकटातही स्थिर राहण्यास मदतच होते म्हणा ना! त्यामुळे संकटांचा ताण प्रशासनाला घेऊ द्या, तुम्ही फक्त त्यांना सहकार्य करा आणि स्वस्थ राहा असाच संदेश या मीम्समधून दिला जातोय!