घरमहाराष्ट्र'राज ठाकरे ऋतूप्रमाणे बदलणारे नेते', गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर सडकून टीका

‘राज ठाकरे ऋतूप्रमाणे बदलणारे नेते’, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर सडकून टीका

Subscribe

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. "ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत", अशा शब्दांत गुलाबराव पाटील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबईच्या दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा झाला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. तसंच, राज ठाकरेंचे भाषण हे भाजपाची स्क्रिप्ट असल्याचं अनेक नेत्यांनी म्हटलं. अशातच आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील फरक मी पाहिला आहे. ज्या प्रमाणे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन ऋतू आहेत. तसे राज ठाकरे तीन ऋतूप्रमाणे बदलणारे नेते आहेत. मनसे स्थापन करताना उत्तर प्रदेशातील लोकांना ठोकलं. पक्ष स्थापन झाल्यावर हम सब भाई आहे. आता काहीच हातात लागत नाही म्हणून हिंदुत्वाकडे टर्न केला. नंतर त्यांना चमत्कार झाला. मोदींकडे गुजरातला गेले. आता मोदींवर टीका केली बारामतीत गेले, शरद पवारांची मुलाखत घेतली. आता शरद पवार वाईट झाले. हा सिझनेबल कार्यक्रम आहे, कोणत्याच ऋतूत काहीच मिळत नाही. पावसाळ्यात पाणी पडत नाही, उन्हाळ्यात ऊन पडत नाही, हिवाळ्यात थंडी वाजत नाही. मूळ त्यांनाच धागा मिळत नाही, मी कोणत्या धाग्याने यशस्वी होऊ शकतो. म्हणून ही धडपड आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

- Advertisement -

‘राज ठाकरेंना मी लहानपणापासून ओळखतो. हाफ चड्डीपासून मी शिवसैनिक आहे. तेव्हा पासून ते आमच्या जिल्ह्यात यायचे. चंचल माणूस आहे, चंचल स्वभावामुळे या गोष्टी होत असतात’, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. तसंच, यावेळी त्यांनी मशिदी समोर मोठ्या भोंग्याच्या मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असं म्हटलं होते. यावर ही त्यांनी प्रतिक्रीया दिली. ‘हनुमान चालिसा लावायला कोणाची मनाई आहे? भोंगा उतरवा म्हणणारे पहिले आपल्या बापाचे बाप बाळासाहेब ठाकरे होते. त्या काळात कोणत्या माईच्या लालची हिंमत होती बोलायची? तेव्हा आमचा एकच बाप बोलायचा. पहिला पिक्चर काढला आता हा पिक्चर टू आहे. बोलणं सोप्पं आहे. करणं कठीण आहे. मला बोलायला लावू नका, त्यांना जितकी मी ओळखतो तितकं तुम्ही ओळखत नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळं पेट्रोल पंपाच्या समोर हनुमान चालिसा लावू’, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

त्याशिवाय काल केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची शिवतीर्थावर (घरी) जाऊन भेट घेतली. त्यांच्या या भेटीनंतर मनसे-भाजपा युतीची चर्चा रंगली होती. यासंदर्भातही आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”भेट घेतली पाहिजे, त्यांच्या नावात ठाकरे आहे. काही तरी आरोप करायचे म्हणून करतात. ज्या माणसाला स्वतःचा एक नगरसेवक राखता येत नाही त्याच्या बद्दल काय बोलायचं?” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाचा पोलिसांवर दबाव- प्रवीण दरेकर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -