घरमहाराष्ट्रराज्यात आज, उद्या लसीकरण नाही

राज्यात आज, उद्या लसीकरण नाही

Subscribe

राज्यात शनिवार 15 मे आणि रविवार 16 मे असे दोन दिवस लसीकरण होणार नाही. कोविन अ‍ॅप अपडेशनसाठी दोन दिवस लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील बदललेल्या अंतराचे नियोजन करण्यासाठी कोविन अ‍ॅप बंद राहणार आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यासाठी पहिला डोस घेतल्यानंतर किमान 12 आठवड्यांचे अंतर ठेवण्याबाबत केंद्र सरकारच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पुढील दोन दिवसात कोविन अ‍ॅपवर काही बदल केले जाणार आहेत. त्यामुळे 15 आणि 16 मे रोजी लसीकरण सत्राचे कुठेही आयोजन करण्यात येणार नाही.

कोविन पोर्टलवरील बदल पूर्ण होताच लसीकरणाबाबत पुढील सूचना देण्यात येतील, असे देखील सांगण्यात आले आहे.राज्याच्या गरजेप्रमाणे लस पुरवठा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तातडीने केंद्र शासनाने 20 लाख डोस उपलब्ध करून द्यावेत. परदेशातून लस आयात करण्यासाठी देशपातळीवर राष्ट्रीय धोरण तयार झाल्यास त्याचा फायदा राज्यांना होईल. सध्या अन्य राज्यांकडून जागतिक निविदा काढल्या जात आहेत. परदेशातील लस उत्पादकांकडून राज्यांना वेगवेगळे दर दिले जात आहेत. त्यामुळे राज्यांमध्ये स्पर्धा न होता केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे, अशी मागणी केल्याचे टोपे यांनी सांगितले.

- Advertisement -

राज्यात किमान 20 ते 22 लाख नागरिकांना लसीचा दुसरा डोस द्यायचा आहे. त्याची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवरही उपलब्ध आहे. अशा स्थितीत केंद्र शासनाने वस्तुस्थिती समजून घेताना राज्याला जेवढ्या डोसेसची आवश्यकता आहे त्याची पूर्तता करण्यासाठी व्यवस्थितपणे नियोजन करावे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमातून लस दिली जाते, याकडे टोपे यांनी लक्ष वेधले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -