घरताज्या घडामोडीCovid-19 अटकाव करण्यासाठी आणखी कठोर नियमांची गरज नाही - गृहमंत्री

Covid-19 अटकाव करण्यासाठी आणखी कठोर नियमांची गरज नाही – गृहमंत्री

Subscribe

कोरोनाशी संबंधित केंद्राकडून जी मार्गदर्शके आणि नियमावली येते त्याची अंमलबजावणी ही राज्य सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज संस्थांमध्ये करण्यात येते. सध्या राज्यात कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सध्या पुरेसे असे कडक निर्बंध आहेत. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या निर्बंधामध्ये आणखी कडक नियम करण्याची गरज नसल्याचे मत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले आहे. सध्याचे अंमलात असलेला कोरोना प्रतिबंधात्मक प्रोटोकॉल हा पुरेसा असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. तर विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या निमित्तानेही गृहमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. तर झोटिंग समितीच्या अहवालावर कोणतेही भाष्य करण्यासाठी त्यांनी नकार दिला.

महाविकास आघाडीचाच विधानसभा अध्यक्ष होणार
राज्यात महाविकास आघाडीलाच बहुमत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. यंदा आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पण महाविकास आघाडीकडे बहुमत असून महाविकास आघाडीचाच अध्यक्ष निवडून येईल असेही वळसे पाटील यांनी सांगितले. लवकरच ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल असेही वळसे पाटील म्हणाले.

- Advertisement -

संजय राठोड यांचा विषय मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतील

माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद देण्याचा विषय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अखत्यारीतील आहे. त्यामुळे याबाबतचा योग्य निर्णय हा मुख्यमंत्रीच घेऊ शकतील असे गृहमंत्र्यांनी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री योग्य वेळी संजय राठोड यांच्या बाबतीतला हा निर्णय जाहीर करतील असेही संजय राठोड यांनी स्पष्ट केले. तर बुलडाण्यातील आमदारावर करण्यात आलेल्या पोलिसांमार्फतच्या कारवाईवरही गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. बुलडाण्यातील मलकापूरचे कॉंग्रेस आमदार राजेश एकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या रॅलीमुळे तसेच जंगी वाढदिवस साजरा केल्यामुळे त्यांच्या विरोधात तसेच कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले असेल, म्हणूनच गुन्हा दाखल करण्यात आला असेल, पोलिस योग्य ती कारवाई करतील असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -