घरमहाराष्ट्रपोस्टाचे आता व्हर्च्युअल कार्ड

पोस्टाचे आता व्हर्च्युअल कार्ड

Subscribe

खात्यातून कॅशलेस व्यवहार करणे शक्य

भारतीय पोस्टाकडून संपूर्ण राज्यात एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पण यापुढचा टप्पा म्हणून पोस्टाकडून व्हर्च्युअल कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्टाच्या ग्राहकांना एटीएमचा पुढचा टप्पा म्हणजे पोस्टाच्या खात्यातून कॅशलेस व्यवहार करणे शक्य होईल. सध्याच्या एटीएम कार्डमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही.

पोस्टाच्या ग्राहकांना सध्या दिलेल्या एटीएम कार्डचा वापर हा केवळ पैसे काढण्यापुरता मर्यादित आहे. या कार्डचा वापर कोणताही ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी होत नाही.

- Advertisement -

त्यामुळेच यापुढच्या काळात व्हर्च्युअल कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा देण्यात येणार आहे. सध्या संपुर्ण राज्यात पोस्टाचे ७५ एटीएमचे नेटवर्क आहे. या नेटवर्कच्या माध्यमातून ग्राहकांना पैसे काढण्याची सुविधा आहे. तसेच इतर कोणत्याही बँकाच्या एटीएम कार्डचा वापर पोस्टाच्या एटीएममध्ये करता येतो. यापुढच्या काळात पोस्टाचे व्हर्च्युअल कार्ड वापरण्याची सुविधा ग्राहकांना मिळेल. त्यामुळे कार्डलेस अशा स्वरूपाचे व्यवहार करणे शक्य होणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या सुविधा
इंडिया पोस्ट पेमेंट बँकला संलग्न अशा सुविधा देण्यात येणार आहेत. त्यामध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात मोबाईल बँकिंगची सुविधाही देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिश अग्रवाल यांनी सांगितले. अधिकाधिक सुविधा ग्राहकांच्या मोबाईलवर उपलब्ध करून देण्याचा पोस्टाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकचे १ कोटी खाते संपूर्ण भारतात उघडण्यात आले आहेत. त्यापैकी १० लाख खाते एकट्या महाराष्ट्रात खुले करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -