घरमहाराष्ट्रगुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्याचा खात्यालाही धसका; असे केले कृत्य

गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या अधिकाऱ्याचा खात्यालाही धसका; असे केले कृत्य

Subscribe

चंद्रपूर गुन्हे शाखेत हा प्रकार घडला. येथील एका अधिकाऱ्याने केलेल्या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले. अनेक गुंतागुंतीची प्रकरणे त्या अधिकाऱ्याने तडीस नेली होती. त्यामुळे त्याचा दरारा होता. गुन्हेगारांमध्ये त्याची दहशत होती. अडीच वर्षे या अधिकाऱ्याने गुन्हे शाखेत काम केले. या कालावधीत त्याने कार्यालयातही बदल केले. कार्यालयाचा चेहरा बदलून टाकला. एसी, पडदे, दिवे, टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल या गोष्टी त्या अधिकाऱ्याने बदलल्या. त्या अधिकाऱ्याची नुकतीच मानव संसाधन विभागात बदली झाली. 

चंद्रपूरः गुन्हेगारांना घाम फोडणारा पोलीस अधिकारी बदली झाल्यानंतर त्याच्या सोबत टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, एसी, पडदे आणि दिवे अशा सर्वच गोष्टी घेऊन गेला. त्याच्या या कृतीने पोलीस खातेही चक्रावले आहे. बहुतांश वेळा बदली झालेला अधिकारी त्याच्या सहकाऱ्यांना, स्थानिक नागरिकांना काही तरी भेटवस्तू देऊन जातो. येथे उलट घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

चंद्रपूर गुन्हे शाखेत हा प्रकार घडला. येथील एका अधिकाऱ्याने केलेल्या कामगिरीचे सर्वांनीच कौतुक केले. अनेक गुंतागुंतीची प्रकरणे त्या अधिकाऱ्याने तडीस नेली होती. त्यामुळे त्याचा दरारा होता. गुन्हेगारांमध्ये त्याची दहशत होती. अडीच वर्षे या अधिकाऱ्याने गुन्हे शाखेत काम केले. या कालावधीत त्याने कार्यालयातही बदल केले. कार्यालयाचा चेहरा बदलून टाकला. एसी, पडदे, दिवे, टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल या गोष्टी त्या अधिकाऱ्याने बदलल्या. त्या अधिकाऱ्याची नुकतीच मानव संसाधन विभागात बदली झाली.

प्रशासकीय अधिकाऱ्याची बदली करण्याचा नियम आहे. तर काही वेळा अधिकारी स्वतःहू इच्छितस्थळी बदली करुन घेतात. बदली झाल्यानंतर अधिकाऱ्याला त्या कार्यालयाकडून निरोप दिला जातो. त्याला भेटवस्तू दिली जाते. निरोप देताना तो अधिकारीही कार्यालयाला भेटवस्तू देऊन जातो. ही परंपरा गेली अनेक वर्षे सुरु आहे. मात्र चंद्रपूर येथील अधिकाऱ्याची बदली झाली आणि त्याने थेट तेथील वस्तूही स्वतः सोबत घेऊन गेला.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे हा अधिकारी चंद्रपूर येथे बदली होण्याआधी तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होता. तेथून बदली झाली तेव्हाही त्याने तेथील सर्व वस्तू सोबत नेल्या होत्या. त्याचीही चर्चा झाली होती. त्यावेळी त्या अधिकाऱ्याने आपल्या कृतीचा खुलासा केला होता. मी ज्या वस्तू नेल्या त्या माझ्या कमाईच्या होत्या. अन्य कोणाच्या वस्तू मी घेऊन गेलो नाही, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले होते. त्यानंतर प्रशासनाने पोलीस निरीक्षक कार्यालयाची डागडुजी केली होती.

आता या अधिकाऱ्याची गुन्हे शाखेतून मानव संसाधन कार्यालयात बदली झाली आहे. बदलीमुळे तो अधिकारी नाराज होता. त्याच नाराजीतून त्याने कार्यालयातील सर्व वस्तू स्वतः सोबत नेल्याची चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -