भाजपाच्या मोहित कंबोजांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचा बडा नेता; भ्रष्टाचार उघड करणार

राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे.

MOHIT KAMBOJ

राज्यातील मागील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तरुंगात आहेत. त्यानंतर आता आणखी एक राष्ट्रवादीचा नेता लवकरच तरुंगात जाणार असल्याचे भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्याचे नाव आणि त्याच्या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी मोहित कंबोज पत्रकार परिषद घेणार आहेत. यासंदर्भात कंबोज यांनी तीन ट्विट केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीवादीच्या नेमक्या कोणत्या नेत्याचा घोटाळा कंबोज उघडकीस आणणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (one ncp big leader irrigation scam case will meet nawab malik and anil deshmukh mohit kamboj bharatiya tweet)

“राष्ट्रवादीच्या संबंधीत नेत्याच्या सिंचन घोटाळ्याची फाईल 2019 साली बंद करण्यात आली होती”, असे स्पष्ट संकेत मोहित कंबोज यांनी दिले आहेत. “राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या बेनामी कंपन्या, त्यांच्या गर्लफेंडच्या नावावर असलेली संपत्ती, भ्रष्टाचाराची माहिती आपण देणार आहोत” असे कंबोज यांनी म्हटले. या संदर्भात कंबोज यांनी तीन ट्वीट केले आहेत. या ट्विटनुसार “एनसीपीचा एक बडा नेता नवाब मलिक आणि अनिल देशमुखांप्रमाणे तुरुंगात जाणार आहे”, असे मोहित कंबोज यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

“राज्यातील सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी झाली पाहिजे. या घोटाळ्याची फाईल परमबीर सिंह यांच्या काळात, 2019 साली बंद करण्यात आली होती”, असे मोहित कंबोज यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

“लवकरच आपण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा पर्दाफाश करणार आहे. त्या नेत्याची भारतातील संपत्ती, देशाबाहेरील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावरील संपत्ती, त्याने मंत्रीपदावर असताना केलेला भ्रष्टाचार, त्याच्या कुटुंबाच्या संपत्तीची यादी याची माहिती देणार आहे”, असे मोहित कंबोज यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

राज्याच्या मागील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीचे 2 मंत्री म्हणजेच नवाब मलिक आणि अनिल देशमुख आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे तरुंगात आहेत. आर्थिक व्यवहार आणि इतर घोटाळ्यांमुळे त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्या आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रावादीच्या कोणत्या नेत्याचे कंबोज घोटाळे उघडकीस आणतात आणि त्यानंतर त्या संबंधीत नेत्याला अटक होते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हेही वाचा – ‘या’ मुद्द्यांवर अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता