घरठाणेठाण्यात चाळीचा सज्जा पडल्याने एक जण किरकोळ जखमी

ठाण्यात चाळीचा सज्जा पडल्याने एक जण किरकोळ जखमी

Subscribe

ठाणे : समता नगर, राजीव गांधी कंपाउंड येथील पंचरत्न चाळीतील सहा घरांचा सज्जा पडल्याची घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाले असून त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे.
सुरेश वाल्मिकी (33) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ज्यावेळी सज्जा पडला त्यावेळी ते सज्जावर उभे होते. पंचरत्न चाळ ही 25 वर्ष जुनी आहे. तळ अधिक एक मजला अशा या चाळीत 12 घरे आहेत. त्यापैकी सहा घरांचा सज्जा दुपारी अचानक कोसळला. हा सज्जा अंदाजे 50 फूट लांब 4 फूट रुंद आहे.

या घटनेची माहिती सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी -कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, अतिक्रमण विभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर, उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने तो भाग काढण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाचे जवान व अतिक्रमण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

- Advertisement -

काठ अँड घाट हॉटेल्सला आग
पांचपाखाडी, नितीन कंपनी सर्विस रोडवरील तळ अधिक एक मजली असलेल्या मे. काठ अँड घाट हॉटेल्सला मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग हॉटेल्सच्या पहिल्या मजल्यावरील लाकडी साहित्याला लागल्याने ती धुमसत होती. चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आली. मे. काठ अँड घाट नावाचे 250 स्क्वेअर फुटाचे तळ अधिक एक मजली हॉटेल्स हे सनी पावसकर यांच्या मालकीचे असून तेथे लाकडाचा जास्त वापर करण्यात आला आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

कळव्यात रुग्णालयाचे सिलिंग पडले
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पीओपी (प्लास्टर) सिलिंग पडल्याची घटना रविवारी (25 जून 2023) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली होती. हृदयरोग विभागाच्या समोरील कॉरिडॉरमध्ये हे सिलिंग पडले आणि सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत नव्हती. सुमारे 100 मीटर लांब असलेल्या पीओपी सिलिंग पैकी 20 मीटर पीओपी सिलिंग पडले होते. तर, उर्वरित सिलिंग धोकादायक झाली असल्याने ती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून काढण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -