घरमहाराष्ट्रसनदी अधिकार्‍यांची टीम देवेंद्र गॅसवर

सनदी अधिकार्‍यांची टीम देवेंद्र गॅसवर

Subscribe

ओएसडी कर्तव्यमुक्त करण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच आपल्या पदाचा दिलेला राजीनामा यामुळे आता टीम देवेंद्रचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील सनदी अधिकारी तसेच खाजगी ओएसडी आता गॅसवर आहेत.

युतीच्या सलग दुसर्‍या टर्मसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुन्हा एकदा सनदी अधिकार्‍यांची पसंती होती. पण शिवसेनेच्या भूमिकेमुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेमणुक मुख्यमंत्री पदावर पुन्हा होईल या आशा बाळगल्या आहेत.तर मुख्यमंत्र्यांच्या नकोश्या यादीत असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या मात्र आशा पल्लवीत झाल्या आहेत.

- Advertisement -

राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांचा सेवा कालावधी सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. पण त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देत हा कालावधी आता मार्चअखेरीस संपणार आहे. तर मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांचाही कालावधी नोव्हेंबर अखेरीस आता संपणार आहे. विधानसभा निवडणुका आणि अयोध्येचा निकाल अशा सगळ्या घटनाक्रमामुळे त्यांना मुदताढ देण्यात आली होती. राज्यातील गृह विभागातील महत्वाची पदे तसेच महापालिकांचे आयुक्त पद अशी सगळी महत्वाची पदे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले अधिकारी जवळ केले होते. त्यामुळेदुसर्‍या टर्ममध्येही या अधिकार्‍यांचे भवितव्य ठरणार होते.त्यामध्ये नगर विकास, महसूल, गृहनिर्माण तसेच गृह खाते यासारख्या महत्वाच्या विभागांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे गृह खाते, नगर विकास खाते यासारखे विभाग आपल्याकडे ठेवण्याचेही हेच कारण होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच टर्मच्या सुरूवातीला संपुर्ण प्रशासनामध्ये एकाचवेळी मोठी खांदेपालट केली होती. त्यामध्ये अगदी स्वीय सहाय्यकांपासून ते कक्ष अधिकाऱी यांच्याही बदल्या करण्यात आल्या होत्या. आघाडीच्या काळातील सगळ्या महत्वाच्या खात्यांवरील अधिकारी वर्गाची उचलबांगडी युती सरकारच्या स्थापनेनंतर झाली होती.नकोशा अधिकार्‍यांच्या आशा पल्लवीतटीम देवेंद्र फडणवीस यांनी नाकापेक्षा मोती जड ठरणार्‍या अधिकार्‍यांची वेळोवेळी उचलबांगडी केली होती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसर्‍या टर्ममध्ये सलग नेमणुक मिळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या नकोशा अधिकार्‍यांच्या यादीतील अधिकार्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामध्ये सनदी अधिकार्‍यांपैकी संजय पांडे, तुकाराम मुंडे तसेच निधी पांडे यासारख्या अधिकार्‍यांना थोडासा धीर आला आहे.

- Advertisement -

सर्व खाजगी ओएसडीना मुक्त करण्याची मागणीमहाराष्ट्रात सध्या काळजीवाहू सरकार आहे. म्हणून सर्व खाजगी ओएसडीना त्यांच्या कर्तव्यातून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यातील महत्वाच्या फाईल्स या काळजीवाहू सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या फाईल्सची यादी मागवून घ्यावी. मागील तारखांचे आदेश काढण्याची शक्यता असल्याची भीत नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. सध्या टीम देवेंद्रसाठी काम करणारे एकुण ८ ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी (ओएसडी) आहेत. या आठ जणांच्या टीमसाठी राज्य सरकारने महिन्यापोटी ७ लाख ६९ हजार १०८ रूपये महिन्यापोटी मोजले आहेत. टीम देवेंद्रसाठी ओएसडी म्हणून काम करणार्‍यांमध्ये पायाभूत सुविधा, सोशल मिडिया, माध्यम सल्लागार, स्वीय सहाय्यक, जलयुक्त शिवार, राज्य सरकार – पक्ष समन्वयक या कामासाठी हे ओएसडी काम करत होते.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -