घरताज्या घडामोडीMaharashtra Lockdown: ...तर राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय दिसत नाही - विजय वडेट्टीवार

Maharashtra Lockdown: …तर राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय दिसत नाही – विजय वडेट्टीवार

Subscribe

जर वेळीस आपण निर्बंध लावले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये राज्यात विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसंच ज्या वेगाने हा व्हेरिएंट पसरतोय, त्यामुळे आता लोकांच्या हातात आहे की, आपण कसं राहायचं, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन लागण्याची भीती पसरली आहेत. त्यातच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. लोकांनी जर सर्व नियम पायदळी तुटवले तर लॉकडाऊन शिवाय पर्याय दिसत नाही, असं विजय वडेट्टीवार एका वृत्तवाहिनी बोलताना म्हणाले.

नक्की काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘जर आपण वेळीस कोरोनावर नियंत्रण मिळवलं नाही आणि वेळीस आपण निर्बंध लावले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये राज्यात विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. तसंच ज्या वेगाने हा व्हेरिएंट पसरतोय, त्यामुळे आता लोकांच्या हातात आहे की, आपण कसं राहायचं. आपण काय नियम पाळावे? किंवा पाळू नये, हे लोकांनी ठरवायचं आहे. लोकांची जर सर्व नियम पायदळी तुटवले. तर लॉकडाऊन शिवाय पर्याय दिसत नाही, असं मला वाटतंय.’

- Advertisement -

तसेच वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ‘रेल्वे असेल किंवा विद्यार्थ्यांचं असेल किंवा बाकीचे जे काही मागच्या वेळेस निर्बंध लावले होते त्या सगळ्यांचा विचार करूनच लॉकडाऊनची स्थिती येतेय. पण तो लॉकडाऊन कधी करायचा हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.’

दरम्यान गुरुवारी राज्यात ५ हजार ३६८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ हजार १९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या राज्यात १८ हजार २१७ कोरोनाबाधित सक्रीय रुग्ण आहेत. तर राज्यात गुरुवारी १९८ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ४५०वर पोहोचली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; ‘या’वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -