घरमहाराष्ट्रआमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम, तुम्हाला ठोकायलाही ते सक्षम, संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम, तुम्हाला ठोकायलाही ते सक्षम, संजय राऊतांचा राणेंवर हल्लाबोल

Subscribe

ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांच्या मुलाबाळांचा चांगल्या मार्गानं भरभराट होवो. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचं नेतृत्व करायला ते सक्षम आहेत आणि तुम्हाला ठोकायलाही ते सक्षम आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोलही केलाय.

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवर केलेल्या टीकेला आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. आपण त्यांना काही दिवस पाहतायत, ते बाहेर कार्यक्रमाला जात आहेत. माणसाचं आजारपण सांगून येत नाही. जे आरोप करतायत त्यांच्या प्रकृतीची आम्हाला चिंता वाटतेय, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. शिवसेना नेते विनायक राऊत आणि महापौर किशोरी पेडणेकर, संजय राऊतांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, त्यांच्या मुलाबाळांचा चांगल्या मार्गानं भरभराट होवो. तुम्ही तुमची प्रकृती सांभाळा, आमच्या मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. राज्याचं नेतृत्व करायला ते सक्षम आहेत आणि तुम्हाला ठोकायलाही ते सक्षम आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंवर हल्लाबोलही केलाय.

- Advertisement -

तत्पूर्वी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं होतं. मी कोणाच्या आजारपणावर बोलणार नाही, दुसरा व्यक्ती असता तर पदावर राहिला नसता, राजीनामा दिला असता, आता उभं राहायला पण दोन दोन माणसं लागतात. या महाराष्ट्रात अशी कोणावर पाळी आली नाही, असंही नारायण राणे म्हणाले होते.

मुख्यमंत्री मंत्रालयात जात नाही, मुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाही, मुख्यमंत्री सभागृहात जात नाहीत. मुख्यमंत्री झालात हीच इतिहासात नोंद होईल, हेच यांचं काम आहे. हेच कर्तृत्व आहे. गुणवत्ता, पात्रता नसतानाही मी सव्वा दोन वर्ष काढली. ही बाळासाहेबांची पुण्याई आहे. एवढं सोडलं तर बाकी काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

- Advertisement -

पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार

आमच्याकडे एवढा साठा पडलाय, हे ट्रकच्या ट्रक घेऊन आम्ही ईडीच्या कार्यालयात गेलो नाहीत तर पाहा तुम्ही. ज्या दिवशी आम्ही जाऊ त्या दिवशी ईडीचं ऑफिस ते बंद करून निघून गेलेले असतील. तुमचे हे धंदे बंद करा, तुम्ही एक्स्पोज झालेला आहात. पुढच्या आठवड्यात ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा मी बाहेर काढणार आहे. जे आम्हाला धमक्या देताय, ईडीची नोटीस मातोश्रीवर येणार, ईडीची नोटीस तिकडे जाणार, पुढच्या आठवड्यात त्याच ईडीचा सगळ्यात मोठा घोटाळा, भ्रष्टाचार, क्रिमिनल सिंडिकेट इथेच बसून मी बाहेर काढणार आहे, असं म्हणत संजय राऊतांनी ईडी अधिकाऱ्यांना खुलं आव्हान दिलंय.


हेही वाचाः पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार, संजय राऊतांचं ओपन चॅलेंज

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -