घरमनोरंजनNagarjuna : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने जंगल घेतलं दत्तक

Nagarjuna : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनने जंगल घेतलं दत्तक

Subscribe

दाक्षिणात्या सुपरस्टार नागार्जुनने एक ह्रदयस्पर्शी असे काम केले आहे. चित्रपटांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने लोकांच्या मनात घर करणाऱ्या नागार्जुनने तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या वाढदिवसानिमित्त चक्क 1 हजार 80 एकरचं जंगल दत्तक घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही त्याचे खूप कौतुक केले जातेय. नागार्जुन आणि त्याची एनजीओ या जंगलाची काळजी घेणार आहे. यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांनी 2 कोटी रुपयांची देगणी देण्याची घोषणा केली आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्याने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘मुख्यमंत्री केसीआर गारु यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! मला कळविण्यात आनंद होत आहे की, अक्किनेनी कुटुंबाने चेंगिचेरला वन क्षेत्र अर्बन पार्कसाठी दत्तक घेतले आहे आणि याची पायाभरणी केली आहे.

- Advertisement -

नागार्जुन आणि त्याची पत्नी अमला हैदराबादमध्ये ब्लू क्रॉस नावाची एनजीओ चालवतात. या एनजीओच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणासाठी काम केले जाते. खासदार जे संतोष कुमार यांच्यासह नागार्जुन त्यांच्या कुटुंबीयांसह पायाभरणी समारंभात सहभागी झाले होते. अक्किनेनी नागार्जुन, अमला, मुलगे नागा चैतन्य आणि निखिल आणि इतर कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. वनक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कल्पनेनुसार 2 कोटी रुपयांचा धनादेश हरिता निधीला दिला आहे.

- Advertisement -

नागार्जुन यांनी केले ट्विट 

नागार्जुन म्हणाले की, खासदार संतोष कुमार यांनी आपल्या राज्यात आणि देशात पर्यावरणास अनुकूल आणि आपले पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी ग्रीन इंडिया चॅलेंज कार्यक्रम सुरू केला होता. कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक रोपे लावल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या बिग बॉस सीझनच्या अंतिम शोमध्ये त्यांनी सांगितले की, संतोष कुमार यांच्याशी वनभूमी विषय दत्तक घेण्याबाबत चर्चा केली आणि स्टेजवर मी वनभूमी दत्तक घेणार असल्याचे घोषित केले.

कार्यक्रमात घोषित केल्याप्रमाणे अर्बन फॉरेस्ट पार्कची पायाभरणी केल्याचा मला आनंद वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या वनक्षेत्रामुळे उद्यान वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांना मोठी मदत होणार आहे.


शिवजयंतीनिमित्त रवी जाधव यांच्या ‘बाल शिवाजी’ चित्रपटाची घोषणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -