घरताज्या घडामोडीOxygen shortage: अशोक चव्हाणांनी केला गडकरींना फोन, रातोरात ऑक्सिजन टँकरची सुटका

Oxygen shortage: अशोक चव्हाणांनी केला गडकरींना फोन, रातोरात ऑक्सिजन टँकरची सुटका

Subscribe

नागरिकांचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. रुग्णवाढ झाल्यामुळे ऑक्सीजन,आयसीयू बेड,रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला होता. या संकटाच्या काळात आता ऑक्सीजनचाही काळाबाजार होऊ लागला आहे. नफेखोर या तुटवड्याचा फायदा घेत आहेत. राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारने दुसऱ्या राज्यांतून ऑक्सीजन साठा उपलब्ध करुन दिला आहे. या ऑक्सीजन साठ्यात नफेखोरी होत असल्याचा प्रकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. नितीन गडकरी भाजप नागपूर महानगर कार्यकारिणी बैठकीच्या समारोपावेळी बोलत होते.

राज्यात कोरोना रुग्णांना ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात लागत आहे. परंतु राज्यात तुटवडा निर्माण झाल्यामुळे बाहेरील राज्यातून हा ऑक्सीजनचा साठा आणला जात आहे. परंतु नांदेडला ऑक्सीजन पुरवठा करण्यात येणारा ऑक्सीजनचा टॅंकर पळवल्याचे गडकरींनी सांगितले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्याला फोन केला असल्याचा नितीन गडकरींनी सांगितले. अशोक चव्हाण म्हणाले नांदेडला विशाखापट्टनमहून ऑक्सीजनचा पुरवठा करणारा टँकर तेथील ट्रान्सपोर्टरने पळवला असून आपल्याकडे त्याने १५ लाख रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे त्याचे टँकर जप्त करण्यात आले आहेत.

- Advertisement -

अशोक चव्हाण यांनी सांगितल्यानंतर रात्री १२ ते १ च्या सुमारास त्या ट्रान्सपोर्टरला फोन केला. त्याच्यावर दाब टाकून त्याला म्हणालो हे बरोबर नाही. तुमच्यावर कारवाई करण्यात येईल यानंतर त्या ट्रान्सपोर्टरने तो टँकर सोडला. यामुळे अशोक चव्हाण यांच्या फोननंतर गडकरींनी ताबडतोब ऑक्सीजनचा टँकर सोडवला असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

शोषण होण्यापासून काळजी घेतना संघर्ष टाळा

राज्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीचा अनेक नफेखोर फायदा घेत आहे. रुग्णवाहिका,टँकर, खासगी रुग्णालये,मेडिकल,फळवाले असे बरेच जण सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गरिबाची पिळवणूक होता कामा नय. कोरोना परिस्थिती असल्यामुळे ऑडिटिंग, छापे मारणे,चौकशी, डॉक्टरांना मारहाण करण्याची वेळ नाही. परंतु आपल्याला नागरिकांचे शोषण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच याबाबतची काळजी घेताना कोणताही संघर्ष टाळायला हवा.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -