घरमहाराष्ट्ररक्ताची नाती कधीच संपत नसतात, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

रक्ताची नाती कधीच संपत नसतात, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई – आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे म्हणाले होते. या विधानावर आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडेंच्या यांच्या विधानावर आता पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली. रक्ताची नाती कधीच संपत नसतात. मी कुणाशीही वैर बाळगत नाही. माझा कुणीही राजकीय शत्रु नाही. मी संबंधित व्यक्तींच्या विचारांसोबत राजकीय तुलना करत असते, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

धनंजय मुंडे काय म्हणाले होते –

आम्ही राजकारणात एकमेकांचे वैरी आहोत. नाते संबंध हे अगोदर होते. राजकारणामुळे वैर निर्माण झाले. त्यामुळे कुणाच्या वक्तव्यामुळे, वागण्यामुळे काय परिणाम होतात हे ज्याने त्याने आत्मपरिक्षण करावे. हे वारंवार अशाप्रकारची वक्तव्यं येतात ते बरोबर की चुकीचे त्याबाबत आकलन करून मांडावे. ही राजकीय विधाने आहेत. काय बोलायचे हे त्यांनी ठरवावं असं धनंजय मुंडे यांनी सांगितले.

- Advertisement -

पढे त्यांनी भगवान गडाच्या दसऱ्याची परंपरा ही संतश्रेष्ठ भगवानबाबांनी सुरू केली. स्व.गोपीनाथ मुंडे असेपर्यंत ही परंपरा सुरू होती. आता कुणी मेळाव्याला जायचे कुणाला बोलवायचे. दसरा मेळाव्याला केंद्रीय मंत्र्याला आमंत्रण का दिले नाही ते त्यांनाच विचारा. आम्ही भाऊ-बहीण म्हणून राजकीय विरोधक आहोत. आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांबद्दल काय बोलावे हे ज्याने त्याने ठरवावे. मी त्याबाबत सांगण्यासाठी मी लहान आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -