घरमहाराष्ट्रराज्य सरकारचा तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका

राज्य सरकारचा तक्रार मागे घेण्यासाठी दबाव; परमबीर सिंग यांची हायकोर्टात याचिका

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार तक्रारी मागे घेण्यासाठी दबाब टाकत असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या वक्तव्याचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, आजच परमबीर सिंग यांच्यावर एट्रोसिटीसह बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

एकीकडे एट्रोसिटी दाखल झाल्यानंतर कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असताना आता परमबीर सिंग यांनी राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली आहे. मी १९ एप्रिलला राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांना भेटलो होतो. त्यावेळी संजय पांडे यांनी, तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या, अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत राज्य सरकार असल्याचं त्यांनी सांगीतल. संजय पांडे यांच्या वक्तव्याची चौकशी व्हावी या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी ही याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने दोन प्रकरणात परमबीर सिंग यांच्या विरोधात चौकश्या लावल्या आहेत. याबाबत राज्य सरकारच्या विरोधात परमबीर सिंग यांनी ही याचिका केली आहे. यापूर्वी त्यांनी तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका केली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -