घरमहाराष्ट्रपरमबीर सिंहांची फोन रेकॉर्डिंग याचिका उच्‍च न्‍यायालयात

परमबीर सिंहांची फोन रेकॉर्डिंग याचिका उच्‍च न्‍यायालयात

Subscribe

अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी सरकार टाकते दबाव, महासंचालक संजय पांडे आणि परमबीर सिंहांचे संभाषण न्यायालयात

‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील तक्रार मागे घ्या, नाही तर राज्य सरकार तुमच्यावर अनेक गुन्हे दाखल करेल’, असा नवा गंभीर आरोप करत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त, गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे राज्य सरकारवर नवा आरोप करत परमबीर यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. या याचिकेवर आता 4 मे रोजी सुनावणी होणार आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि परमबीर सिंह यांच्यातील फोनवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंगच न्यायालयात सादर केल्याने ठाकरे सरकारवरील अडचणीत वाढ झाली आहे. महासंचालक दर्जाचा अधिकारीच दुसर्‍या महासंचालकाचे संभाषण टॅप करत असल्याने पोलीस दलाचेही टेन्शन वाढले आहे. ‘19 एप्रिल रोजी महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली असता त्यांनी आपल्याला अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेण्यास सांगितले. सिंह यांनी ही तक्रार मागे घेतली नाही, तर त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करेल’, असेही पांडे म्हणाल्याचे सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीच सिंह यांनी केली आह

- Advertisement -

सिंह यांच्यावतीने प्रसिद्ध वकील मुकुल रोहतगी हे बाजू मांडत असून येत्या 4 मे रोजी सुनावणी आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह इतर पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. …फोन टॅपिंगचा वापर करत आरोपपरमबीर यांनी सरकारवर जे काही आरोप केले आहेत ते फोन टॅपिंगच्या माध्यमातून केल्याचे बोलले जाते. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी बोलताना परमबीर यांचा जो काही संवाद झाला तो टॅप करत त्यामधील संभाषणाचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे, असे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -