घरक्रीडाबॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा मृत्यू

बॅडमिंटन खेळताना हृदयविकाराचा झटका येऊन खेळाडूचा मृत्यू

Subscribe

बॅटमिंटन खेळताना अचानक एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. सचिन तापडिया (44) असे या बॅटमिंटन खेळाडूचे नाव आहे. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते.

बॅटमिंटन खेळताना अचानक एका खेळाडूला हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना परभणीत घडली आहे. सचिन तापडिया (44) असे या बॅटमिंटन खेळाडूचे नाव आहे. सकाळी बॅडमिंटनचा पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. (parbhani 44 years old man dies of heart attack while playing badminton)

मिळालेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय सचिन तापडिया हे बॅडमिंटन खेळण्यासाठी दररोज परभणीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये जात होते. शुक्रवारी सकाळीही ते बॅडमिंटन खेळण्यासाठी आले असता पहिला राऊंड पूर्ण केल्यानंतर ते खर्चीवर बसायला जात होते. ते पाणी पित असताना खाली पडले. त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर कर्मचारी व खेळांडूंनी त्यांना पाणी दिले. त्यानंतर त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

त्यानंतर उपस्थित असलेल्या लोकांनी सचिन तापडिया यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी त्यांनी कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, मुलगी आणि पत्नी आहेत. सचिन तापडिया यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अनेकांना मैदान, जीममध्ये हृदयविकाराचा झटका

- Advertisement -

याआधी अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना खेळाडूांना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. क्रिकेटनंतर जिममध्येही व्यायाम करताना हार्ट अटॅक आल्याचे प्रकार समोर आले आहेत. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनाही वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता.


हेही वाचा – मोठी बातमी! शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युतीची घोषणा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -