Monday, July 26, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्या काळात; फडणवीसांचा दावा

फोन टॅपिंग मोदींच्या नव्हे तर मनमोहन सिंग यांच्या काळात; फडणवीसांचा दावा

Related Story

- Advertisement -

फोन टॅपिंग प्रकरणावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरलं आहे. विरोधक संसदेत गोंधळ घालत आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोन टॅपिंग हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्हे तर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात झाले, असा दावा केला आहे. केंद्र सरकारने कुणाचेही फोन टॅप केले नाहीत. विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे आहेत, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. इस्रायली पेगासस स्पायवेअरद्वारे देशातील पत्रकार आणि राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याचं वृत्त समोर आलं आहे. यानंतर याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटत आहेत. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून बचाव करण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत फोन टॅपिंगच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला. फडणवीस यांनी याआधीचे फोन टॅपिंगचे आरोप केलेल्या प्रकरणांचे दाखले देत फोन टॅपिंग हे मनमोहन सिंग यांच्या काळात झाल्याचा दावा केला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होत आहे. देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळाचा विस्तार करुन भारताच्या इतिहासामध्ये सर्वसमावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार केलं. ज्या मंत्रिमंडळामध्ये ओबीसी, एससी, एसटी अशा अनेक नविन चेहऱ्यांना संधी मिळाली आणि आपले गुण दाखवण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन डिरेल करण्याच्या दृष्टीने अतिशय विचारपूर्वक रनणीती तयार करुन कपोलकल्पित अशाप्रकारच्या बातम्या पेरुन आणि त्यामध्यमातून अधिवेशनाचं कामकाज विचलित केलं जात आहे, असं फडणवीस म्हणाले.

टेलिग्राफ अॅक्टनुसार हवी ती माहिती मिळते

- Advertisement -

मुळातच पेगाससचा विषय समोर आला आहे. त्यासंदर्भात काही माध्यमांनी यादी छापली आहे, तर काही माध्यमांनी बातमी छापली आहे. या बातमीला कुटलाही आधार नाही आहे. यासंदर्भात भारत सरकारच्यावतिने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की, भारत सरकारची कुठलीही एजन्सी अशाप्रकारे गैरकायदेशीरपणे हॅकिंग करत नाही. आपल्याकडे टेलीग्राफ कायदा आहे. जर माहिती हवी असेल तर त्यासाठी एक विशेष पद्धत ठेवण्यात आली आहे.

NSO ही जी पेगासस तयार करणारी कंपनीने देखील सांगितलं आहे की अशा प्रकारची यादी आधारहीन आहे. त्यांनी मीडिया संस्थांना नोटीस देखील दिली आहे.

फोन टॅपिंगचे आरोप मनमोहन सिंग यांच्या काळात

- Advertisement -

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच सरकार फोन टॅपिंग करतंय असाही आरोप झाला होता. समजावादी पार्टीचे नेते अमरसिंह यांनी सर्वात आधी हा आरोप केला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंग यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन टॅपिंग केले आहेत, असं सांगितल होतं. जे काम झालंय ते कायदेशीर झालंय असही त्यांनी सांगितलं होतं, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॅान्ड्रिग रोखण्यासाठी हे फोन टॅप झाल्याच सांगितलं. ते योग्य असल्याच समर्थन केलं होतं. फोन टॅपिंग होत असल्याची बातमी येणं चुकीचं असून याबाबत पुढे काळजी घेऊ असंही मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. UPA च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीर रित्या योग्य आहे हे सांगितलं गेलं, असंही त्यांनी सांगितलं.

 

- Advertisement -