घरक्राइमPune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संबंध थेट लंडनपर्यंत

Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संबंध थेट लंडनपर्यंत

Subscribe

कुरकुंभ कुरकुंभ एमआयडीसीमधील कारखान्यातून दिल्ली आणि लंडनला ड्रग्ज कुरिअर करण्यात येत होते. यात पुणे पोलिसांनी दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर लंडनला ड्रग्ज पाठवण्याची जबाबदारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे : राज्यात ललित पाटील ड्रग्ज प्रकरण ताजे असतानाच गेल्या तीनपासून पुणे पोलिसांनी मेफेड्रग्जचा (एमडी ड्रग्ज) मोठा साठा जप्त करत आहेत. पुणे मेफेड्रग्ज प्रकरणाचे धागेतोरे हे थेट लंडनपर्यंत पोहोचले आहेत.  पुणे पोलिसांनी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहत कंपनीवर छापा टाकून 1000 कोटी रुपयांचे 500 किलो एमडी ड्रग्ज आणि विश्रांतवाडीमधून 100 कोटी रुपयांचे 50 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलीस करत असताना  रेडी टू इट फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्सची लंडनमध्ये तस्करी होत असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ कुरकुंभ एमआयडीसीमधील कारखान्यातून दिल्ली आणि लंडनला ड्रग्ज कुरिअर करण्यात येत होते. यात पुणे पोलिसांनी दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर लंडनला ड्रग्ज पाठवण्याची जबाबदारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापैक कुमार आणि भुटीया हे दोघेही फूड कुरिअरचा व्यवसाय करत होते. यातून दिल्लीतून लंडनमध्ये आतापर्यंत 4 पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Uddhav Thackeray : गद्दारांना पन्नास खोक्यांचा हमीभाव, पण…; शेतकरी प्रश्नांवर ठाकरेंचा संताप

विश्रांतवाडीत सापडलेले मेफेड्रॉन दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीमधील अर्थकेम या केमिकल कंपनीत तयार करण्यात आल्याची माहितील पोलिसांनाी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कंपनीवर छापा टाकला असता आणखी बाराशे कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. यावेळी अनिल साबळे या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली. अनिल साबळे हा एमडी ड्रग्ज तयार करण्याचे काम कर होता. तर युवराज भुजबळ नावाचा सायंटिस्ट होता. एमएसस्सी केमिस्ट्री असलेल्या या सायंटिस्टला देखील मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या कंपनीतूनच दिल्लीमध्ये एमडी ड्रग्ज पाठविल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी दिल्लीत दोन ठिकाणी छापेमारी करत 400 कोटी रुपयाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -