घरमहाराष्ट्रवाडाच्या दिव्यांग मुलांना बोलीभाषांतील राख्यांचे अप्रूप

वाडाच्या दिव्यांग मुलांना बोलीभाषांतील राख्यांचे अप्रूप

Subscribe

वाडाच्या दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना बोलीभाषेतील राख्यांचे मोठे अप्रूप वाटत आहे. त्यांनी आवडीने या राख्या बांधल्या आहेत.

आजकाल ‘ब्रो’ आणि ‘सिस’च्या जमान्यात बोलीभाषेतल्या दादा, भाऊ, भाऊराया अशा शब्दांचे महत्व समजावे यासाठी श्रीरंग संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. संस्थेतर्फे बोलीभाषेतल्या शब्दांच्या राख्यांचा प्रचार करण्यात येत आहे. सोमवारी वाडा येथील दिव्यांग मुलांच्या शाळेत या राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. इथल्या विद्यार्थ्यांनाही या बोलीभाषेतील राख्या खूप भावल्या.

- Advertisement -

गंधाच्या आधारे विद्यार्थी फुलांचा तिरंगा साकारणार

७३ व्या स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते १४ वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी फुलांचा तिरंगा साकारणार आहेत. श्रीरंग संस्थेतर्फे डाॅ.सुमीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ गंधाच्या आधारे दिव्यांग विद्यार्थी ही किमया साधत विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. १३ ऑगस्ट सकाळी ११ वाजता ओमकार अंध आणि विशेष शाळा, जिजाऊ सोशल ट्रस्ट, झाडपोळी, वाडा येथे हा विश्वविक्रम होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंप्रमाणे राणेही म्हणाले, ‘निवडणूक पुढे ढकला’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -