घरताज्या घडामोडीअवैध दारूप्रकरणी आंबेजोगाईच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय मोरे निलंबित

अवैध दारूप्रकरणी आंबेजोगाईच्या ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीआय मोरे निलंबित

Subscribe

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलच दारूबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या सुरूवातीलच दारूबंदीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आंबेजोगाईमधील अवैध दारुच्या मुद्द्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे म्हटले.

आंबेजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पीआय वासूदेव मोरे आल्यापासून अवैध धंदे वाढले आहेत. हातभट्टी, बनावट दारुची विक्री, सर्रास होणारी गुटखाची विक्री, बेकायदेशीर क्लब जुगार हे खलेआम आंबोजोईल शहरात सुरू आहे, असा आरोप भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला. तसेच, पीआय मोरे यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. याउलट अनेक वादग्रस्त प्रकार त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये घडत आहेत, असे त्यांनी म्हटले.

- Advertisement -

 

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -