घरताज्या घडामोडीजनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान मोदींचे आता सोशल डिस्टंसिंगचे आवाहन

जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान मोदींचे आता सोशल डिस्टंसिंगचे आवाहन

Subscribe

जनता कर्फ्यूनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला भारतीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे. करोनाविरोधात आपल्या जीवावर उदार होऊन राष्ट्रसेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी, पोलीस आणि सर्व सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता समस्त भारतीयांनी आपापल्या गॅलरी, खिडकीत येऊन थाळ्या वाजवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासहीत अनेक सेलिब्रिटी, पुढारी आणि सामान्य जनतेने टाळ्या, थाळ्या, घंटा वाजवून आभार प्रदर्शन केले. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोशल डिस्टंसिंगचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले पंतप्रधान?

‘टाळ्या, थाळ्या आणि घंटा वाजवून करण्यात आलेला नाद हा धन्यवादाचा नाद आहे. त्याचबरोबर हा एका मोठ्या लढाईला सुरुवात करण्याचा शंखनादही आहे. त्यामुळे या संकल्पनेसोबत का मोठ्या लढाईला आपण सर्वांनी स्वत:ला बंधनात बांधून घेऊया’, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, करोना विषाणूच्या लढाईचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशाने एका मनाने धन्यवाद दिले आहेत. यासाठी देशवासियांचे खूप खूप आभार, अशा शब्दांत मोदींनी जनतेचे आभारही मानले आहेत.


हेही वाचा – थाळ्या, टाळ्या, घंटानाद आणि भारतीयांची एकजूट


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -