पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न

यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले

pm narendra modi dehu visit inaugurate saint tukaram maharaj shila temple

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकापर्ण सोहळा पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने वारकरी उपस्थित होते. वारकऱ्यांनी संत तुकाराम महाराजांच्या जय घोषात या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, तुषार भोसले उपस्थित होते.


पंतप्रधान मोदी संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात दाखल होताच वारकऱ्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले.

यावेळी मोदींनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, विठ्ठल-रुख्मिणी यांचे दर्शन घेतले. लोकार्पण सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. यानंतर देहू येथील माळवडी येथे पंतप्रधानांची सभा पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हेलिकॉप्टरने देहूत दाखल झाले. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत. यानंतर मोटारीने मोदी माळवाडी, परंडवाल चौक, मुख्य कमान मार्गाने 14 कमानीजवळ पोहोचले. यानंतर मोदी पायी मंदिराजवळ गेले. येथे 400 वारकऱ्यांसमवेत शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यानंतर मोदी पुन्हा मोटारीने सभास्थानी पोहचले.

पंतप्रधान आपले वारकरी – देवेंद्र फडणवीस

यादव साम्राज्य संपल्यानंतर संपूर्ण समाजाची घडी विस्कटली. कर्मकांड, बुवाबाजीचे स्तोम माजले. नागरिकांचे शोषण सुरू होते. त्यावेळी भागवत धर्माची पताका हाती घेऊन संतांनी महाराष्ट्र धर्माला जागृत केले. ज्ञानेश्वर माऊलींनी पाया रचला. त्याचा कळस तुकाराम महाराज झाले. तुकाराम महाराजांनी अंधश्रद्धा दूर करून सश्रद्ध समाज तयार करण्याचे काम केले. त्यांच्या शब्दांचे धन कोणीही बुडवू शकले नाही. इंद्रायणीने त्यांचे शब्द पुन्हा वर केले. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे काम पंतप्रधान करत आहेत. जे का रंजले गांजले, या धर्मानुसारच पंतप्रधान करत आहेत. पंतप्रधान आपले वारकरी आहेत. वारकऱ्यात सारेच सेवक असतात. आपले पंतप्रधान प्रधानसेवक आहेत. संपूर्ण जग आपले आहे, हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले. तेच मानून संपूर्ण जगाला लस पोहचवण्याचे काम मोदीजींनी केले, असे फडणवीस म्हणाले.


पंतप्रधान मोदींची पगडी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; विरोधानंतर पगडीवरील ओळीत बदल