घरमहाराष्ट्रपुण्यात लष्काराचे गणवेश घालून फिरणाऱ्याला अटक

पुण्यात लष्काराचे गणवेश घालून फिरणाऱ्याला अटक

Subscribe

लष्कराचे गणवेश घालूण फिरणाऱ्या संशयित आरोपीला जवानांना वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

लष्कराचे गणवेश परिधान करुन खुल्याने फिरणाऱ्या एका संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी पुण्यातील लष्कराच्या कमांड हॉस्पिटलच्या परिसरात फिरत होता. तो सारखा हॉस्पिटलच्या परिसरात का फिरत आहे, असा संशय लष्कराच्या जवानांना आला. जवानांनी त्या व्यक्तीची कसून चौकशी करत त्याला ताब्यात घेतले.

संशियत आरोपीकडे बनावट कागदपत्रे

लष्कराच्या जवानांनी संशयित आरोपीला पकडले आणि त्याची चौकशी केली. त्याने आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गणवेश घातला होता. कमांड हॉस्पिटल आणि फोर्सेस मेडिकल कॉलेज जवळजवळ आहेत. या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी मेडिकल हॉस्पिटलमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात. याच गोष्टीचा संधी साधत संशयित आरोपी विद्यार्थ्यांचे गणवेश परिधान करुन हॉस्पिटल परिसरात फिरत होता. लष्कराच्या जवानांना या आरोपी विषयी संशय आला आणि त्यांनी त्यला पकडले. जवानाने त्याची चौकशी केली. या संशयित आरोपीकडे बनावट कागदपत्रे सापडली. त्याचबरोबर काही वस्तूही मिळाल्या. लष्कराने या आरोपीला वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. वानवडी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दहशतवाद्यांचा कुलगाम येथील लष्कराच्या कॅम्पवर हल्ला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -