घरमहाराष्ट्रचोराला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा वापर

चोराला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडियाचा वापर

Subscribe

पुणे, पिंपरी चिंचवड मधील बातम्या वाचा थोडक्यात ....

सोसायटी आणि बंद फ्लॅटची रेकी करून अवघ्या दहा मिनिटांत फ्लॅटमध्ये शिरून चोरी करणारा सराईत सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा चोर सराईत गुन्हेगार असून आतापर्यंत त्याने पोलिसांच्या हातावर तुरी दिलेली आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांना सोशल मीडियावर त्या चोराचे फोटो व्हायरल केले आहेत. पुनावळे येथील गगनगिरी सोसायटीत सहा सप्टेंबरच्या भरदुपारी हा चोरटा घुसला. तेव्हा दुपारचे दोन वाजून दोन मिनिटं झाली होती. कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याने हातात एक पेपर घेतला होता. तो थेट इमारतीत शिरला आणि त्याने इमारतीच्या ‘ए’ विंगची रेकी केली. मात्र या विंगमध्ये कुलूपबंद फ्लॅट नसल्याने तो दोन वाजून पाच मिनिटांनी रिकाम्या हाती लिफ्टने खाली उतरला. मग त्याने बी विंगकडे मोर्चा वळवला, दुसर्‍या मजल्यावर वैभव वाघ यांचा २०२ नंबरचा फ्लॅट कुलूप बंद अवस्थेत त्याला दिसला. त्याने त्या फ्लॅटचा कोयंडा उचकटला. घरात प्रवेश करून कपाटाचे लॉक तोडले आणि त्यातील पिशव्या घेऊन तो अवघ्या काही सेकंदात बाहेर ही पडला.

तिसर्‍या सीसीटीव्हीत, दोन वाजून दहा मिनिटांनी, त्याच्या हातात दिसत असलेल्या पिशव्यांमध्ये सोने-चांदीचे दागिने आहेत. तरबेज आणि शांत डोक्याचा हा चोर घरफोडीकरून झाल्यावर रस्त्यावरील वाहनांकडे लिफ्ट मागतो आणि पळून जातो. पहिल्या आणि तिसर्‍या सीसीटीव्हीमधील वेळ पाहिली तर त्याने केवळ दहा मिनिटांत रेकी करून हात साफ केल्याचे दिसते. या सराईत चोरट्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली.तो बिनधास्त पणे शहरात वावरून कुलूपबंद घरे फोडतो. मात्र पोलिसांना त्याला अटक करता आलेली नाही. त्यामुळे अखेर त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला आहे. त्याचे फोटो आणि व्हीडिओ पोलिसांनी व्हाट्सऍप ग्रुपवर तसेच फेसबुकवर व्हायरल केले आहेत.

- Advertisement -

विकृताचे तीन महिलांसमोर अश्लिल कृत्य

पिंपरी । पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात एका विकृताने ती महिलांसमोर हस्तमैथुन केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलांनी वाकड पोलिसात तक्रार नोंदवली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्या, मुंबईत अशा विकृत कृत्यांमध्ये वाढ झाली असून या विकृतांना जरब बसवण्याची मागणी नागरीक करत आहेत. दिलीप यादव (३८) असे या विकृताचे नाव असून तो मुळचा इलाहाबाद येथे रहणार आहे. तो सध्या काळेवाडी परिसरात वास्तव्यास आहे. या विकृताने ३१ वर्षीय एकट्या महिलेला पाहून भर रस्त्यात तिच्या घरासमोर हस्तमैथुन केले याप्रकरणी महिने वाकड पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आरोपी दिलीप गवळ्याचे काम करतो.धक्कादायक म्हणजे दोन ते तीन महिलांसमोर देखील त्याने हस्तमैथुन केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.परंतु महिलांनी घाबरून त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली नव्हती. तो एकट्या महिलांना आणि लहान मुलींना पाहून निर्लजपणा करायचा. एक महिलेने हिंमत करून वाकड पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे.आरोपी हा अविवाहित असून अगोदर ठाण्यात गवळ्याचे काम करायचा.तो त्या ठिकाणी अशा प्रकारची कृत्ये करत होता का, याचा शोध वाकड पोलीस करत आहेत.


हलगर्जीपणाचा ठपका ठेवत वैद्यकीय अधिकार्‍यांना हाकलले

pregnant-
प्रतिनिधिक चित्र

राजगुरुनगर-पुणे । ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती एकट्या परिचरिकेला करावी लागल्याचा प्रकार कडूस (ता.खेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला होता, या घटनेबाबत आरोग्य केंद्रातील दोन वैद्यकीय अधिकार्‍यांना दोषी धरीत त्यांना जिल्हा परिषदेच्या आस्थापनेतून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहे. आरोग्य सेवा ही अतितत्काळ सेवा म्हणून पहिला जात असताना आरोग्य विभागात काम करणारे वैद्यकिय डॉक्टर या सेवेकडे दुर्लक्ष करत आहेत. लोकसेवेची शपथ घेऊन शासनाच्या मानधनावर काम करणारेच जर असे करत असतील तर आरोग्य सेवेच काय होणार असाच प्रश्न विचारला जात आहे. ३१ जुलैच्या सायंकाळी पाचच्या सुमारास सहा किलोमीटर अंतर पार करून ग्रामीण भागातून कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या पूनम ज्ञानेश्वर कारले या महिलेची एकट्या परिचरिकेने प्रसूती केली होती. यावेळी आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते.या घटनेचे गंभीर दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांनी २४ ऑगस्ट रोजी कडूस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. वैद्यकीय अधिकार्‍यांची अनुपस्थिती ही बाब गंभीर असून याबाबत त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश गोरे यांना दिल्या.  ग्रामीण भागातून आलेल्या महिलेस तातडीची वैद्यकीय सेवा देण्यास असमर्थ ठरणे, नेमून दिलेल्या कामात निष्काळजीपणा, हलगर्जीपणा करणे, मुख्यालयी न राहणे व बंधपत्राचे स्पष्ट उल्लंघन केल्याचा ठपका ठेवीत दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेच्या आस्थापणेवरून तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

- Advertisement -

बनावटी नोटा जप्त

पुणे । भोसरी पोलिसांनी पाचशे रुपयांच्या सहा नकली नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून आणखी नकली नोटा मिळण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपने दापोडीमधील एका फळ विक्रेत्याकडून 50 रुपयांची फळे विकत घेतली. त्यासाठी त्याने 500 रुपयांची नोट विक्रेत्याला दिली. ही नोट नकली असल्याचा संशय विक्रेत्याला आला. त्यामुळे त्याने तत्काळ भोसरी पोलिसांशी संपर्क केला. पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांकडून पाचशे रुपयांच्या सहा अशा 3 हजार रुपयांच्या नोटा जप्त केल्या. या नोटा नकली असल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्याकडून आणखीन नकली नोटा मिळण्याची शक्यता वर्तविली आहे.


१७५ डेंग्यूचे संशयित रुग्ण

पुणे । पुणेकरांना हैराण करणार्‍या विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत असतानाच डेंग्यूच्या तापाने आपले हातपाय पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या दहा दिवसांमध्येच डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली आहे, त्यांपैकी सुमारे सव्वीस रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पावसाच्या विश्रांतीमुळे डेंग्यू, स्वाइन फ्लूसारखे विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने साथीच्या रोगांचा फैलाव वेगाने होत असलेला दिसून येत आहे. स्वाइन फ्लूच्या बरोबरीने डेंग्यूनेही नागरिकांवरील पकड घट्ट केली असून ऑगस्ट महिन्यात शहरातील लोकांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. सप्टेंबरच्या पहिल्या दहा दिवसांमध्येच ही संख्या सव्वीसपर्यंत गेल्याचे पहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरुन ही आकडेवारी समोर आली आहे.


…अन्यथा रास्ता रोको

water tapपुणे । रहाटणी पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये कमी पाणीपुरवठा होत आहे. संबंधित पाणीप्रश्न लवकरात लवकर सोडवावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. रहाटणी सौदागर प्रभाग क्रमांक 28 मध्ये अनेक दिवसांपासून कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठा केंद्रावरुन प्रभागात पाणी पुरविले जाते तिथेसुध्दा पाणी पोहचत नाही. पावसाळ्याचे दिवस असून महापालिकेला पाणीपुरवठा करणारे धरण पूर्ण भरले असतानासुध्दा नागरिकांना रोज या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी समस्येची वारंवार तक्रार करुन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.रहाटणी पिंपळे सौदागर या प्रभागातील नागरिक या पाणी समस्येला त्रासले आहेत. रहाटणी पिंपळे सौदागर प्रभागातील पाणीपुरवठा कायमस्वरुपी सुरळीत करुन नागरिकांना पाणी समस्येतून मुक्त करावे. लवकरात लवकर सुरू राहील. परंतु येथे ‘नो पार्किंग’ असणार आहे. आवश्यकतेनुसार बॅरिकेड्स आणि दोराचा वापर केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -