घरक्राइममुंबईतल्या मालवणीतील दंगल पूर्वनियोजीत होती; पोलिसांची धक्कादायक माहिती

मुंबईतल्या मालवणीतील दंगल पूर्वनियोजीत होती; पोलिसांची धक्कादायक माहिती

Subscribe

रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतील मालाड परिसरात दोन गटात राडा झाला असून, दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी मालवणी परिसरात कडक कारवाईला सुरूवात केली.

रामनवमीच्या मुहूर्तावर मुंबईतील मालाड परिसरात दोन गटात राडा झाला असून, दगडफेक झाली होती. या दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांनी मालवणी परिसरात कडक कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मालवणीतील दगडफेक पुर्वनियोजीत होती. तसेच, या घटनेतील आरोपींनी मशिदीजवळ बसून हिंसाचाराचा कट रचला होता, असेही पोलिसांनी सांगितले. (Police Found That Stone Pelting Incident Of Violence During Ram Navami Procession In Mumbai Was Preplanned)

मिळालेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करणाऱ्या मालवणी पोलिसांच्या पथकाने मालवणी पोलिस स्टेशनचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) अधिकारी आणि अन्य एका पोलिसाचे जबाब नोंदवले. त्यावेळी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांच्या जबाबात सांगितले की, हा हिंसाचार अटक आरोपी आणि वॉन्टेड व्यक्तींनी केला आहे.

- Advertisement -

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकाने त्याच्या साथीदारासह ही योजना आखली होती. त्याचा साथीदार फरार आहे. दोघांनीही दंगल घडवण्याच्या उद्देशाने मशिदीजवळील सवेरा हाईट इमारतीजवळ जमाव गोळा केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

एफआयआरमध्ये पोलिसांकडून कलमांमध्ये वाढ

- Advertisement -

याप्रकरणी पोलिसांकडून एफआयआरमध्ये दाखल करण्यात आलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, कलम 120 (बी) वाढवण्यात आले आहे. तसेच, गुन्हेगारी कटाचे आरोप जोडण्याबाबत न्यायालयाला माहिती देण्यात आली आहे.

याआधी, पोलिसांनी कलम 353, 324, 145, 147 आणि महाराष्ट्र पोलिस कायदा लागू केला होता. संबंधित कलमांसह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत नोंदणीकृत होते.

दरम्यान, 30 मार्च रोजी मालवणी भागातील मशिदींजवळून मिरवणूक जात असताना आणि मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यावरून वाद झाला तेव्हा तणाव सुरू झाला. एफआयआरनुसार, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी काढलेल्या या रामनवमी मिरवणुकीत 6,000 हून अधिक लोक सहभागी झाले होते.

एफआयआरच्या हवाल्याने पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दुपारी राम जानकी मंदिरापासून मिरवणूक निघाली. सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही मिरवणूक जामा मशिदीच्या दिशेने जात असताना मशिदीतील काही लोकांनी गाणं बंद करा मशिदीत नमाज सुरू आहे, असे सांगितले. तेव्हा मिरवणुकीतील लोकांनी गाण बंद करण्यास नकार दिला आणि आवाज कमी केला नाही. त्यामुळे अचानक राडा झाला आणि त्यानंतर संबंधित परिसरात दगडफेकही झाली. मात्र, त्यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी दगडफेक करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतले.

दरम्यान मालवणी परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी आतापर्यंत 20 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच 200 हून अधिक लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याचे मुंबई पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘मी नाराज असतो तर…’, नाराजी नाट्याला मंत्री अब्दुल सत्तारांचा पुर्णविराम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -