घरमहाराष्ट्रराज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

राज्यात लवकरच 7231 पदांसाठी पोलीस भरती; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

Subscribe

राज्य राखीव दलातील जे पोलीस अंमलदार आहेत, त्यांना एसआरपीमधून पोलिसात जायला संधी होती. यासाठी पूर्वी 15 वर्षांची अट होती, ती आता 12 वर्षांची केली आहे. यामुळे एसआरपीएफमधून लवकरात लवकर जाता येईल. तसेच पोलिसांसाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सोमवारी विधानसभेत पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात 5297 पदांची पोलीस भरती अंतिम टप्प्यात असून 7231 पदांची पोलीस भरती येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणार्‍या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बाब आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले की, येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईल. उमेदवारांना नेमणूक आदेश देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. काही ठिकाणी मुलाखती घेण्याचे काम सुरू आहे, तर येत्या काही दिवसांत 2019ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. यानंतर महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची दुसर्‍या टप्प्यातील भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल. या पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुढच्या भरतीबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव देत त्याला परवानगी मिळाल्यास ही भरती प्रक्रियादेखील लवकरच सुरू करणार आहोत.

- Advertisement -

पोलीस सेवेत नियुक्त झालेल्या शिपायाला निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षकाची संधी मिळायची नाही. म्हणून कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय दिला नाही. त्यामुळे आता ३० वर्षांनंतर निवृत्त होणारा शिपाई सब इन्स्पेक्टर म्हणून सेवा दिल्यानंतर निवृत्त होईल, असेही गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले.

पोलीस इमारतींसाठी मोठी तरतूद

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारती जुन्या झाल्या आहेत. काही ठिकाणी ब्रिटीशकालीन इमारती आहेत. त्यामुळे ८७ पोलीस स्टेशनचे बांधकाम हाती घेतले आहे. जेथे इमारत नाही, तेथे इमारत करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर यंदाच्या वर्षात पोलीस स्टेशनबरोबर निवासी इमारतींसाठी मोठी तरतूद केली आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

पोलिसांसाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर

राज्य राखीव दलातील जे पोलीस अंमलदार आहेत, त्यांना एसआरपीमधून पोलिसात जायला संधी होती. यासाठी पूर्वी 15 वर्षांची अट होती, ती आता 12 वर्षांची केली आहे. यामुळे एसआरपीएफमधून लवकरात लवकर जाता येईल. तसेच पोलिसांसाठी ५० हजारांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे.

138 नवीन न्यायालये स्थापन होणार

प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी 138 न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. होमगार्ड आपली मोठी ताकद आहे, परंतु बर्‍याच वेळेला होमगार्डमध्ये पूर्ण दिवस काम मिळत नाही. त्यांना काम देण्यासाठी अर्थविभागाकडे प्रक्रिया सुरू आहे.

लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्यांच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती

लोकप्रतिनिधींना येणार्‍या धमक्यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र समिती तयार केली आहे. या समितीच्या रिपोर्टनंतर पुढील उपाययोजना राबवण्यात येईल. मिलिंद भारांबे यांच्या नेतृत्वात समिती तयार केली आहे. लोकप्रतिनिधींना धमक्या आल्यास आपल्याला काळजी करणे आवश्यक आहे, असेही गृहमंत्र्यांनी नमूद केले.

पेपरफुटीप्रकरणी 20 जणांवर गुन्हा दाखल

पेपरफुटीमध्ये राज्यातील पोलिसांनी अतिशय कडक भूमिका घेतली आहे. कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोणालाही खेळता येणार नाही. यामध्ये आतापर्यंत 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे, अशी महितीही गृहमंत्र्यांनी दिली.

राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेणार

या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राजकीय आंदोलकांवरील खटले मागे घेणार असल्याचे जाहीर केले आहे. राजकीय आंदोलनातील 188चे सर्व खटले पाठीमागे घेण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे. प्रस्ताव आयुक्तांच्या माध्यमातून जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यक्षेत्रात असेल, तर जिल्हाधिकार्‍यांकडून आल्यावर केसेस मागे घेणार, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -