घरमहाराष्ट्रगणपती विसर्जनाकरता पोलीसांच्या सुट्ट्या रद्द

गणपती विसर्जनाकरता पोलीसांच्या सुट्ट्या रद्द

Subscribe

गणपती बाप्पांच्या विसर्जनाकरता सार्वजिनक मंडळे ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यासाठी सज्ज झाले असून याकरता पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. याकरता पोलिसांच्या सुट्टा रद्द करण्यात आल्या आहेत.

ढोल – ताशाच्या गजरात आलेल्या बाप्पांचा दीड दिवस, पाच दिवस आणि गौरी गणपतींच्या बाप्पांना निरोप देण्यात आल्यानंतर आता येत्या १२ सप्टेंबरला सार्वजनिक बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. याकरता सार्वजिनक मंडळे ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, या मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर असणार असून विर्सजन घाटावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यासाठी मोठा बंदोबस्त विसर्जन मिरवणुकी दरम्यान करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन सोहळा पार पडतो. तसेच शहरातील ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ आपल्या लाडक्या बाप्पाला ढोल ताशांच्या गजरात निरोप देणार आहेत. त्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी सज्ज झाले आहेत.


हेही वाचा – गणपतीच्या विसर्जन मार्गात पुलकोंडी

- Advertisement -

पिंपरी, चिंचवड, पिंपळे सौदागर येथे पवना नदीच्या काठावर घरगुती बाप्पा तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन करण्यात येते. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सज्ज झाले असून हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणार आहे. यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या असून राज्यातून पोलीस फौज फाटा बंदोबस्तासाठी बोलवण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली आहे.

पोलीस बंदोबस्त तैनात

दरम्यान, बाहेरून आलेले पाच वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार होमगार्ड, एस.आर.पी.एफची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार ५०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरीक पोलीस पोलीस मित्र असे मिळवून २५० जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – जाणून घ्या अष्टविनायकातील आठ गणपती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -