घरमहाराष्ट्रपुणेPolitics : आधी अजितदादांना इशारा आता यू-टर्न; म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर आढळराव नरमले!

Politics : आधी अजितदादांना इशारा आता यू-टर्न; म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर आढळराव नरमले!

Subscribe

पुणे : काही दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर लोकसभेच्या जागेवर मीच उमेदवार म्हणून दावा केला होता. मात्र आता त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद मिळाल्यावर त्यांनी यू-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं काम मी करणार अशी भूमिका, त्यांनी घेतली आहे. त्यामुळे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन आढळरावांचा पत्ता कट केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. (Politics First warning to Ajitdad now U turn Shivajirao adhalrao patil softened after getting the post of MHADA president)

हेही वाचा – Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाचं नाव ‘धोंड्या’; ठाकरेंनी शहांवरही साधला निशाणा

- Advertisement -

शिरूर लोकसभेच्या जागेबाबत कोणत्याही पक्षाने दावा करू नये, ती जागा आमची आहे. आम्हीच तिथे निवडून येणार, असा इशारा अजित पवार यांना काही दिवसांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला होता. त्यामुळे शिरूरच्या जागा वाटपाच्या संबंधात राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये रस्सीखेच असल्याचं चित्र समोर येत होतं. मात्र आता आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आल्यावर त्यांनी घुमजाव केला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज म्हाडा पुणे अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

आढळराव पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मला काम थांबवू नका असं सागितलं आहे. पण पक्ष जो आदेश देईल तो मानणार आणि काम करणार आहे. आज म्हाडा अध्यक्षपद स्वीकारलं आहे. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वस्त:त गोरगरिबांना घरं देण्यासाठी आणि चागलं काम करण्याची संधी दिली आहे. पण आपल्या सर्वांना वाटतं पत्ता कट झालं की काय? पण तसे काहीही नाही, असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – Nana Patole : आतंकवादी असल्याप्रमाणे शेतकऱ्यांवर गोळीबार काय करता? पटोले यांचा संतप्त सवाल

मुख्यमंत्री आणि अजितदादा सांगतील त्यांचं काम करावं लागेल 

शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, शिरुरची जागा दोन नंबरची मतं घेतलेल्या शिवसेनेला मिळायला हवी. यासंदर्भात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवतील. अजित पवार आणि मुख्यमंत्री जो उमेदवार देतील त्याचं आम्हाला काम करावं लागेल, पण शिरूरमधून सुनेत्रा पवार किंवा वळसे पाटील उभे राहतील असे मला वाटत नाही. मी माझा जास्त वेळ माझ्या लोकसभा मतदारसंघात फिरत असतो, लोकांच्या अडचणी सोडवत असतो. मी शिवसैनिक आहे, त्यामुळे मला धनुष्यबाणावर लढायला आवडेल, अशी इच्छाही त्यांनी आढळराव यांनी बोलून दाखवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -