घरमहाराष्ट्रPolitics: प्रादेशिक पक्ष टिकले, तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार; राऊतांनी सुनावलं

Politics: प्रादेशिक पक्ष टिकले, तर पंतप्रधान काँग्रेसचाच होणार; राऊतांनी सुनावलं

Subscribe

मुंबई: महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाने आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत 17 जणांना उमेदवारी दिली आहे. या यादीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या जागांवर आग्रही होता त्या जागांवरही ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावलं आहे. (Politics If the regional parties survive the Prime Minister will be from the Congress Sanjay Raut narrated)

राऊत म्हणाले की, चर्चेला काही मर्यादा असतात. ही चर्चा आमच्यादृष्टीने थांबलेली आहे, असं आम्हाला वाटतं. काँग्रेसने उमेदवार जाहीर केले त्यात रामटेकसुद्धा आहे. मग आम्ही आक्षेप घेतला का? पंतप्रधान कोणाला व्हायचं तर काँग्रेसचाच होणार आहे. आम्ही आणि राष्ट्रवादी प्रादेशिक पक्ष म्हणून जागा मागत आहोत. राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ तिथे काँग्रेससमोर कोणीच नाही. तिथे आम्ही जागा मागतो का? महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे हे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे प्रादेशिक पक्ष टिकले तर पंतप्रधान हा काँग्रेसचाच होणार आहे, अशा शब्दांत ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांना फटकारलं.

- Advertisement -

काँग्रेसने सत्य स्वीकारावं

संजय राऊत म्हणाले की, मला वाटत नाही कुठे नाराजी आहे. जागावाटप महाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही दोन-अडीच महिने एकत्र बसून, चर्चा करून प्रत्येक जागेचा, प्रत्येक भागाचा विचार करून केलेला आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं मुंबईत वर्चस्व नाही, हे सत्य स्वीकारलं पाहिजे. आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी, हे आघाडीत योग्य नाही.

काँग्रेसल ठाकरे गटला शरण गेली, असं वक्तव्य संजय निरुपम यांनी केलं होतं, त्यावरही संजय राऊतांनी सुनावलं आहे. राऊत म्हणाले की, काँग्रेसच अंतर्गत विषय आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात, आम्हाला एकतरी जागा मिळावी.

- Advertisement -

मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. राज्यात काँग्रेसची एकच जागा होती. आज काँग्रेस 16 जागांवर लढणार असून त्यापैकी 10 जागांवर जिंकणार आहे. म्हणजे, गेल्या निवडणुकीतील एक जागा आणि यंदाच्या निवडणुकीत थेट 10 जागा, यावरून काँग्रेस शरण गेली, असं कसं म्हणता येईल? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला आहे.

(हेही वाचा: MVA: मविआत नाराजी; ठाकरे गटाची यादी जाहीर होताच काँग्रेस नेत्यांची ‘दिल्लीवारी’ )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -