घरमहाराष्ट्रतंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात

तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात

Subscribe

तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी तंत्रशिक्षण प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया १० ते २५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे, अशी माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी ३३६ सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी २४२ सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यामुळे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि ई-स्क्रूटनी पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती, हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही सामंत यांनी संगितले.

- Advertisement -

दरम्यान गतवर्षी डीटीईकडून दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू करूनही ५१ हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल उशीरा जाहीर झाल्याने प्रवेश प्रक्रिया वेळेत राबवणे आवश्यक होते. त्यानुसार ३ ऑगस्टपासून अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार होती. परंतु ३ ऑगस्टचा मुहूर्त डीटीईला गाठणे शक्य झाले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -