घरताज्या घडामोडीपद्म पुरस्कार घोषणा; बीजमात राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांना पद्मश्री

पद्म पुरस्कार घोषणा; बीजमात राहीबाई पोपेरे आणि पोपटराव पवार यांना पद्मश्री

Subscribe

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली जात आहे. महाराष्ट्रात तिसरा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. अहमदनगरच्या हिवरे बाजारगावचे माजी सरपंच पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दुष्काळी गावाचा कायापालट केल्यामुळे पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या तिघांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. पोपटराव पवार यांच्यासह ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

पोपटराव पवार यांचे कार्य

जल संधारण, मृद संधारण आणि वनसंधारण या कामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. पोपटराव हे उत्तम क्रिकेटर होते. मात्र त्यांनी क्रिकेटचं वेड सोडलं आणि ते तरूणपणी सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी हिवरे बाजाराची कायापालट केली. लोकांच्या मदत घेऊन त्यांनी दुष्काळमुक्त गाव केलं. तसंच त्यांनी पाणी फाऊंडेशन मध्ये देखील सहभाग घेतला. पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलं आहे.

- Advertisement -

राहीबाई पोपेरे यांचे कार्य

देशी बियाणांचं जतन करून बियाणांची बँक स्थापन करणाऱ्या ‘मदर ऑफ सीड’ अर्थात बीजमाता राहीबाई पोपेरे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. दुर्मिळ झालेल्या देशी बियाणांचं संवर्धन करीत राहीबाई पोपेरे यांनी बियाणांची बँक उभारली आहे. त्यांनी देशी आणि पारंपारिक बियाणांचं संकलन केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल केंद्र सरकारनं पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 पद्मश्री पुरस्कार जाहीर यादी


हेही वाचा – ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री जाहीर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -